पान:आपले आभाळ पेलताना.pdf/५८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आणि खाद्यपदार्थ तयार करणाऱ्या कंपनीत पॅकिंग विभागात रोजगारही मिळणार होता. हे सारे संस्थेतील महिलांना सांगण्याचे धाडस निर्मलात निर्माण झाले नाही. खरे तर तिला बाहेरच्या जगाची ओळख व्हावी म्हणून आम्ही शिबिरांना पाठवले होते.. संस्थेच्या हितसंबंधी ताईंबरोबर त्यांच्या मुलीच्या लग्नानिमित मुंबईतही पंधरा दिवस राहून आली होती त्यामुळे एकूण परिस्थितीच्या संदर्भात स्वत:च्या भविष्याचा विचार करण्याची ताकद तिच्यात आली होती. परंतु तरीही स्त्रीच्या मनाभोवती काही कुंपणे असतातच. ती ओलांडणे शक्य नाही.

 परित्यक्ता स्त्रियांनी काही काळ स्त्री-पुरुष समागमाचा अनुभव घेतलेला असतो. त्यातील सुख.वा समाधान यांची शरीराला सवय झालेली असते. अशावेळी त्यांच्या भावना समजून घेणे, त्यांच्याशी सतत संवाद साधणे महत्वाचे असते. निर्मलाने बाबूशी विवाह करणे यात गैर काहीच नव्हते. किंबहुना तो अधिक सुखाचा आणि सुरक्षित मार्ग आहे. पती पत्नीच्या वयाचा प्रश्न, त्यांच्या व्यवस्थित संवाद असेल तर, उद्भवत नाही. मम्मी उर्फ गंगामावशीही तिच्या निर्णयाकडे आता वेगळ्या दृष्टिकोनातून पाहू लागल्या आहेत. पुढच्यावेळी निर्मला इकडे आली की दिलासात चार दिवस माहेरपणाला येईल. मीही तिच्याशी मोकळेपणाने बोलेन. काही दिवसांपूर्वी मम्मी तिच्या बहिणीकडे मुद्दाम जाउन आल्या आणि निमूचा पत्ताही घेऊन आल्या आहेत. मीही आता निर्मला माहेराला येण्याची वाट पाहात आहे.

 निर्मलेने भोगलेला कौटुंबिक, सामाजिक आर्थिक, मानसिक ताण आणि त्रास आज एक कहाणी बनला आहे. आज निर्मला स्वतंत्रपणे, स्वावलंबी होऊन स्वत:चे जीवन जगत आहे. हे जगणे अडचणी नसलेले आणि पूर्ण सुखी आहे असे मुळीच नाही. पण अडचणींवर मात करण्याची. जिद्द वा धाडस आणि त्यातून मार्ग शोधण्याचा डोळसपणा तिच्यात आला आहे. निर्मला दिलासा घरात राहात असताना सुरुवातीला तिला होणारा त्रास सासू आणि नणंदेच्या फुशीमुळेच कसा दिला जाई हे ती रंगवून सांगत असे. नवऱ्याला दोष देत नसे. जणू तो एक निर्जीव काठी आणि मारणाऱ्या त्या. पण संस्थेत आल्या पासून, हळूहळू तिच्यात बदल घडत गेला. दर बुधवारी दिलासातल्या महिला कायदा सल्ला घेण्यासाठी व वेगवेगळी कौशल्ये शिकण्यासाठी येणाऱ्या महिला एकत्र बसत. गप्पा, गाणी, खेळ यांच्या

आपले आभाळ पेलताना/५६