पान:आपले आभाळ पेलताना.pdf/५७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

शकत होतो. वडिलांचा विचार घ्यावा अशी तिची इच्छा असल्याने मातोळे पाटलांना निरोप धाडला. ते आले. त्यांचे म्हणणे असे की लेकीचे एवढे नुकसान केले नि तीस हजारावर बोळवण करतात ? किमान दीड लाख रुपये पोरीला मिळायला हवेत.

 ही केस शासनामार्फत होती. आम्ही आमचा वकील देऊ शकत नव्हतो. त्यासाठी करावी लागणारी कार्यवाही अत्यंत किचकट आणि वेळखाऊ होती. तिला नैतिक धाडस देण्यापलीकडे आमच्या हाती काहीच नव्हते. मात्र अंबाजोगाईच्या कोर्टातून पोटगीचा दावा चालू केला होता. निर्मला त्या सहा महिन्यांच्या बंदिवासात इतकी जायबंदी झाली होती की, थंडीत गुडघे नि कोपरं दुखत. डोळे अधू झाले होते.. त्यामुळेच तिला मनोमन वाटे की तो पैसा बँकेत ठेवावा. येणारे व्याज आणि थोडे काम करुन येणारे पैसे यांत गुजराण होईल. वडील मात्र शेवटचा आकडा लाखाचा बोलून तिथेच हटून बसले. व्हायचे तेच झाले. पुराव्याअभावी सुधाकर, त्याचे वडील निर्दोष सुटले. प्रत्येक प्रमुख वर्तमानपत्रांतून ती बातमी ठळक अक्षरांत छापून आली. अत्याचार करणाऱ्यांच्या कठोर हातातली अन्याय करण्याची ताकद आणखीन वाढली. स्त्रियांना न्याय मिळावा यासाठी सतत झगडणाऱ्या कार्यकर्त्या... संघटना व्यथित झाल्या. निर्मला - मात्र वडिलांपासून तुटली. तिने वडिलांना लाखाचा हट्ट सोडण्याची विनंती केली होती. आम्हाला तडजोडीत स्वारस्य नव्हतेच. भूमिका म्हणून तसे करणे कितपत होईल याचा आम्हालाही अंदाज येत नव्हता. कारण "दिलासा घर" सुरू होऊन जेमतेम तीन वर्षे होत होती. आम्हीही शिकतच होतो. पण निर्णय निर्मलाने घ्यावा, तोही आमचा विचार न करता, हे आम्ही तिला पटवले होते. तिला हवे असलेले शांत व सुरक्षित जीवन तडजोडीतून मिळणार असेल तर, ती करावी अशी भूमिका आम्ही घेतली होती. वडिलांच्या हट्टापायी हातचे सारेच गेले. "घी गया और गडवा भी गया"

 नंतर मात्र निर्मला अधिक सैरभैर झाली. तिचे मन अंबाजोगाईत गुंतेना. औरंगाबादला दाई ट्रेनिंगसाठी खाजगी व्यवसाय उत्तम रीतीने कराणाऱ्या तज्ज्ञ डॉक्टरांकडे ठेवले. पण त्यातही तिचे मन रमले नाही. कोणत्याही परिस्थितीत वडिलांच्या गावी स्थिर व्हायचे नाही ... राहायचे नाही हे मनात पक्के ठरवले. चुलतभाऊ हडपसरला राहात होता. बाबूही वर्षभरापूर्वी हडपसरला गेला होता. त्याच्याकडून भावाचा पत्ता शोधून काढला. मसाले

आपले आभाळ पेलताना/५५