पान:आपले आभाळ पेलताना.pdf/५६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अगदी अबकं किंवा क्षयज्ञ. त्या क्षयज्ञ नं बोलण्यास सुरुवात केली.

 "भाभी, मी तुम्हाला नि डॉक्टरना ओळखतो. तुमच्या संस्थेबद्दल ऐकून आहे. मला तुमच्या कामामागची भूमिका कळते. निर्मलावर अन्याय झाला आहे. हे मी पण जाणतो. पण मी वकील आहे. कायद्यातले छक्वेपंजे मला कळतात. तुम्हाला वाटत असेल की राज्य कायद्याचे आहे. पण राज्य माणसाचे आहे आणि माणसे मॅनेज करता येतात. त्यांना विविध प्रकारे फितवता येते. न्याय खेचून कसा आणायचा आणि दोषी माणसांना न्यायालयातून निर्दोष कसे शाबीत करायचे याच्या खुब्या माझ्या इतक्या कोणीच जाणीत नाहीत. माझी ओळख लातूरच्या जाणकार वकिलाला विचारून घ्या.

 ... पण तरीही तुमच्याबदलचा आदर आणि निर्मलाची निष्पाप मूर्ती मला इथवर घेऊन आली. आम्ही समझोता करण्यास तयार आहोत. पंधरा हजार रुपये रोख, तिच्या माहेरुन आलेली भांडीकुंडी आणि गळ्यातील मंगळसूत्राचे मणी. जे अर्धातोळा भरतील आणि घरातील एक खोली किंवा त्याचे पैसे पंधरा हजार रुपये रोख देण्यास तयार आहोत. विचार करा आणि दोन दिवसात कळवा.

 ... तुम्ही नकार दिलात तर एवढीच रक्कम खर्चुन न्याय आमच्याकडे खेचून आणू. मानले नाही तर 'हे गेले नि ते गेले' असे म्हणत हात हलवीत बसावे लागेल. शंभरदा विचार करा. असे सांगून क्षयज्ञ निघून गेले. जाताना मला विशेष करून बजावले ते असे.

 "ताई, प्रकरण कढईत असते तेव्हा खमंग वास, दहादिशांना पसरला असतो. मग मोठे मोठे मोर्चे निघतात. निषेधाची पत्रके पावसागत कोसळतात. पण आता सारी राळ जमिनीवर स्थिर होऊन बसली आहे. निर्मला मातोळे कोण हेही लोक विसरले आहेत. अशी प्रकरणे फार तर वर्षभर तेजीत असतात. हेही ध्यानात ठेवा."

 आम्ही निर्मलाशी चर्चा केली. निर्मला या प्रकरणाला एवढी वैतागलेली होती की, तीस चाळीस हजार रुपये घ्यावे नि प्रकरण कायमचे मिटवून टाकावे असे तिला वाटत होते. आम्हीही तिची बाजू... तिचे मन समजू

आपले आभाळ पेलताना/५४