पान:आपले आभाळ पेलताना.pdf/५४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मिळाले नाही की आंघोळीला पाणी सुद्धा मिळाले नाही. सहा महिने ती एकवस्त्रा होती. कित्येकदा सासूने डोळ्यात तिखट टाकून मारले. ती कोठडीत असताना तिचा भाऊ व वडील तिच्या भेटीसाठी आले होते. परंतु ती घरात नाही परगावी गेली वगैरे खोटी कारणे सांगून त्यांना पिटाळून लावले होते. तू जर ओरडलीस तर तुझ्या भावाला आम्ही मारुन टाकू अशी धमकी तिला राहिली होती. मांडवा गाव एक खेडे. तिथे पेपर कुठला येणार ? त्यामुळे बालाजीला गेलेली निर्मल हरवली असल्याचे सासऱ्यांनी दिले होते, ते त्यांच्या वाचण्यात आले नाही. त्यांना वाटे की निर्मला मजेत आहे.

 एके दिवशी तिच्या नणंदेची मैत्रीण घरी आली. तिला घेऊन नणंद गच्चीवर गेली असताना मैत्रिणीने सहज खिडकी उघडली तर आत निर्मला. मैत्रिणीने पाहिले आता ती बाहेर सांगेल म्हणून तिच्या नणंदेने तिला १०० रु.देऊ केले. मैत्रिणीने धाकास्तव पैसे घेतले व कोणाला सांगणार नाही असे म्हटले. परंतु घरी जाऊन तिने सर्व हकीकत आई-वडिलांना सांगितली. मैत्रिणीच्या वडिलांनी जिल्हा पोलीस अधिकाऱ्यांना सर्व हकीगत पत्राने कळविली.

 एक दिवस सकाळी ६ वाजता पोलिसांची जीप दारात येउन उभी राहिली. त्यामध्ये एक महिला पोलिसही होती. तिने निर्मलाची चौकशी केल्यावर, सासूने सांगितले की निर्मला घरातून पळून गेली आहे व ते पेपरमध्ये सुद्धा दिले आहे. तो पेपर तिने आणून दाखविला, ती पेपर आणावयास गेली यावेळी तिच्या मागोमाग स्त्री पोलिसही आत गेली. निर्मलेला शोधले. निर्मला सापडली नाही. गच्चीवर अडगळीची खोली आहे असे सांगून त्या खोलीत नेण्याचे सासूने टाळले. परंतु गच्चीवरच्या खोलीत अखेर ती त्यांना दिसली. निर्मलाला खोली बाहेर काढले. त्यानंतर अंबाजोगाईला शासकीय रुग्णालयात दाखल केले. तिथे उपचार करून तिला माहेरी, सुरक्षित ठिकाणी पाठवले. सुरुवातीस अनेक लोक येऊन भेटत. सहानुभूती व्यक्त करीत. जसजसे दिवस जाऊ लांगले तसतसे एकाकीपण वाढू लागले. दरवेळी .... प्रत्येकाला तीच ती गोष्ट खुलवून सांगण्याचा कंटाळा येऊ यागला नि मग मनात येई, पुढचे आयुष्य कसे जाणार? तिची, एक मोठी चुलत बहीण शकू गावातच दिलेली होती. एका मुलीला जन्म दिला. पंचमीच्या निमित्ताने माहेरी आली ती परत गेलीच नाही. नवऱ्याला बाहेरचा नाद होता. दारूसाठी शेत विकीत राहाणे एवढाच त्याचा उद्योग. तिच्याशी

आपले आभाळ पेलताना/५२