पान:आपले आभाळ पेलताना.pdf/५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

या बाबीचा फायदा निमूला नकळत मिळाला. आता या प्रकरणाबाबत अभ्यास करीत असताना आमच्या लक्षात आले की निमूच्या सुटकेच्या मुद्यावर काही 'रंजककथा' रचल्या गेल्या. अर्थात या कथांमुळे मूळ प्रकरणाला बाधा येत नाही. एक कथा अशी.

 एक दिवस वरच्या व्हेंटिलेटर मधून ... खिडकीतून एक चेंडू खोलीत टपकला. दुपारची वेळ असल्याने सासू झोपली होती. एरवी मुलांनी माडीवर येऊन वरच्या खिडकीतून डोकावण्याचे धाडस केले नसते. एक पोरगं गुपचूपं वर आलं. बंद खिडकीचा आधार घेऊन व्हेंटिलेटरमधून चेंडू पाहण्यासाठी आत डोकावलं. आतील भेसूर निमूवहिनीचा अवतार पाहून. निमूवहिनीचे जिवंत भूत वरच्या खोलीत राहाते. ते चालते. त्या भुताने त्यास बोलावले. असे मुलाने सांगितले. तो मुलगा घाबरून आजारीही पडला. त्याच्या आईवडिलांनी पोलिसात कळवले आणि मग निमूची सुटका झाली.

 निर्मलाने सांगितले ते असे. तिला खोलीत भयानक मारहाण केली जाई. सासूसासरे तिने ओरडू नये म्हणून तिच्या तोंडात बोळे कोंबीत व मारीत असत. तिचा सासरा हा सर्व प्रकार पाहात उभा असे. आमच्या मुलाची नोकरी तू घालवलीस. हिची बोटे तोडा, मान तोडा अशी धमकी देत असे. एकदा सासूने तिला पेटवून देण्याचा प्रयत्न केला व तिला पेटविले देखील. पण ती आरडा-ओरडा करील व आपले बिंग बाहेर फुटेल या भीतीने तिच्या सासऱ्याने तिचे कपडे विझवले. नणंद, सासू, सासरे यांच्या जाचाने तिचे मानसिक बळ कमकुवत झाले होते. सासरा बुटाच्या लाथा मारीत असे. सासू तिला तुडवीत असे. अंधाऱ्या खोलीत एकाच जागी तिला बसून राहावे लागत असे. आडवे होऊन झोपायचे नाही, झोपली तर सासू तिचे गुडघे, हाताचे कोपरे, लोखंडी बत्याने सडकून काढीत असे. दररोज तिला रात्रीच्या सुमारास खोली उघडून अर्धी भाकरी नि एक वाटी पाणी तेवढे मिळत असे. त्यावरच ६ महिने ती गुजराण करीत होती. विवाह प्रसंगी निर्मला फार छान दिसत होती. गुडघ्यावर तोंड टेकवून बसल्यामुळे तिच्या गालाला जखमा झाल्या होत्या. एकाच जागी बसून मांड्यांना जखमा झाल्या होत्या. बसलेल्या जागेभोवती साखरेचे रिंगण केल्यामुळे मुंग्या होऊन तिला चावीत असत. एवढा जाच सहन करुनही जर का ती झोपली तर तिला लाथा खाव्या लागत. खोलीच्या बाहेर पडण्यास बंदी असल्यामूळे नैसर्गिक विधी तिला खोलीतच उरकावे लागत. सहा महिन्यात निर्मलाला तोंड धुवायला

आपले आभाळ पेलताना/५१