पान:आपले आभाळ पेलताना.pdf/५२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

खोलीत निमूला कोंडून ठेवले. सर्व खिडक्या बंद, दाराला कुलूप, विधी करण्यासाठी एक घमेले ठेवले. एका भिंतीच्या वरच्या व्हेंटिलेटर मधून जाळीमधून हवा नि उजेड येई त्याचीच काय ती सोबत. रात्री बारा वाजून गेल्यावर सासू येई. दरवाजातून एक चतकोर भाकरी, वाटीभर पाणी देई. दिवसभरातील घाण नाकाला पदर लावून इकडे तिकडे बघत बाहेर टाकी. पुन्हा दरवाजा बंद. असे महिन्यांमागून महिने जात होते. चार महिने झाले तरी निमूला मारून टाकून तिची विल्हेवाट कशी लावायची याचा मार्ग सापडत नव्हता. सुधाकर नि त्याचा बाप दोघेही पोलिस विभागातले. त्यामुळे कायद्याची भीतीही वाटत असणार. निमूला मारुन तिचे तुकडे करुन ते बाहेर नेण्याचाही घाट घातला. सुधाकर तसा बिनडोक्याचा. त्याने कडबा कटर आणला आणि रात्री एकदीड वाजता तिच्या हाताच्या बोटाचे पेर कडबाकटर मधून कापले. जीवाच्या आकांताने ती किंचाळली नि मग सारे घरच घाबरले. तिचा आवाज आजूबाजूच्या लोकांनी ऐकला तर धोकाच होता. मग कडबाकटरचा बेत रद्द झाला. निमू उपासमार, घाण यांनी ... 'नैसर्गिकरीत्या' मरावी म्हणून इतरही उपाय केले जात. तिला मुंग्या लगाव्यात म्हागून भोवती साखर पेरली. तिचे मन खचावे म्हणून समोर कॉट ठेवून त्यावर जाते, दगड बांधलेला बिछाना वगैरे सामान ठेवले. सहा महिने उलटले डोक्याला तेल नाही. अंगाला पाणी नाही. पोटात रोज वाटीभर पाणी नि चतकोर भातरीचा खुराक जात होता. त्यामुळे अंगावरचे नसलेले मांसही झडून गेले. डोळे खोल गेले.

 निर्मलाला मारुन टाकून विल्हेवाट लावण्यापूर्वी खुनाच्या आरोपात अडकू नये याचीही खबरदारी घेतली होती. स्थानिक वर्तमानपत्रात निवेदन दिले की, आमची तरुण सून बालाजी यात्रेला गेली असताना तिथे हरवली. ती सापडली नाही. कोणाला सापडली तर त्याने कळवावे. इनाम मिळेल वगैरे... माणसाच्या शरीरातील आणि मनातील जीवेच्छा इतक्या बळकट असतात की प्रतिकूल वातावरणातही माणूस जीव जगवत राहातो. जपत राहातो. निमूही जगत होती. मरावेसे वाटले तरी जगत होती.

 एक कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी आणि न्याय मिळवून देणारा अधिकारी त्या जिल्ह्यात काम करीत होते. त्यातूनही एका तरुण अधिकाऱ्याच्या कारकीर्दीची सुरुवात असल्याने एक विलक्षण धडाडी त्याच्या कार्यपद्धतीत होती. जिल्ह्याच्या बाहेरही त्यांच्या नावाचा बोलबाला होता.

आपले आभाळ पेलताला/५०