पान:आपले आभाळ पेलताना.pdf/५१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 निर्मलेला घेऊन वडील मांडव्याला परतले. मांडवा डोंगरातलं लहानसं खेड. मातोळे पाटलांच्या घरातला हा बखेडा कुणालाच माहीत नव्हता. माहेरवाशीण चार दिवसांसाठी आली तर लाडाकोडांची. पण महिनोन्-महीने राहिली तर त्याची चर्चा होते. घरच्यांना टोमणे बसतात. तसेच होऊ लागले. त्यात सुधाकरच्या बापाचा ... सासऱ्यांचा दोनदा सांगावा आला. निमूच्या सवतीला ... मावसनणंदेला त्यांनी परत पाठवले होते. निर्मलाने परत यावे असा आग्रह त्यांनी धरला. घरी आई नि मोठी बहीणं म्हणत की बाईचा हट्ट किती चालणार? शेवटी मारतो तो आपलाच नवरा. बाहेरचा तर कोणी मारत नाही ना ? नवराच बायकोवर हक्क दाखवणार. निमूलाही सुधाकराची आठवण येई. कित्येक दिवसात .. महिन्यात ... दोन वर्षात त्याची संगत मिळाली नव्हती. सासऱ्यांचा सांगावा तिने झेलला. आईकरवी वडलांना निरोप दिला की औशाला नेऊन घाला, पोचती करा. नाहीतरी म्हणतातच की बाईचा जलम, चुलीतल्या ढलपीचा, मुक्याने जळतांना, राख व्हावे. निमूची औशाला पाठवणी झाली. सासरचे वातावरण होते तसेच होते. ती दुसरी बया बरीक नव्हती. सासरा गोडीने सांगे की झालं गेलं विसरुन जा. जर तू औरंगाबादच्या मोठ्या सायबांना सांगितलं तर सुधाकरला परत ट्रेनिंगला घेतील. ट्रेनिंग संपलं की बदलीच्या जागी नवं घर करून देऊ. सासूचा त्रास सुटेल. नवा संसार सुरू होईल. सुधाकर ही हेच सांगे. कधीकधी कांगावा करी.

 निमू सासरी परतल्यानंतरची दोन वर्षे माहेरशी संबंध नव्हता. ना माहेरी जाणे वा माहेरच्यांनी लेकीला पहायला येणे. त्यात अधिकाचा महिना आला, जावयाने ठरवले की अचानक निर्मलाच्या वडिलांच्या ... सासऱ्यांच्या दारात जायचे, अधिकाचे धोंडे खाऊन मोटारसायकलच्या पैशांची वसुलीही करून घ्यायची. सुधाकर एक दिवस अचानक सासऱ्याच्या दारात मोटारसायकल घेऊन उभा राहिला. निमूला बालाजीला पाठवल्याचे सांगितले. सारे काही झकास चालले आहे, याचा निर्वाळा दिला आणि मोटारसायकलचे हप्ते भरले नाहीत तर गाडीवर जप्ती रोईल, असेही सांगितले. सासऱ्याने इकडून तिकडून हातमिळवणी करून दोन हजार रुपये जावयाच्या हातात ठेवणे. पुरणाच्या धोंड्याचे वाण जावयाला दिले नि बोळवण केली.

 .... निमूला यात्रेला नेण्याचा देखावा सासूने केला. पण तिची बालाजीची यात्रा झाली वरच्या मजल्यावरच्या अडगळीच्या खोलीत. त्या

आपले आभाळ पेलताना/४९