पान:आपले आभाळ पेलताना.pdf/३७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

नाचत होती.

.....मेरे हाथोमे नऊ नऊ चुडीयाॅं रेऽऽ
जरा ठैरो सजन मजबुरीयाँ है ऽऽऽ

 हातातल्या इन्द्रधनुषी बांगडया खनकावीत तालात ठुमकणारी मीरा.

 मीराला नवऱ्यावर मनभरून 'प्यार' करायचा होता. स्वैपाकघर सजवून, छान छान पदार्थ बनवून त्याला खिलवायचे होते. एक प्यारीसी गुड्डीपण हवी होती. वडिलांबरोबर परतलेल्या मीराला यातले काय काय मिळाले याबद्दल नेहमीच उत्सुकता वाटे. सुमारे सहा महिन्यानंतर श्यामा, संस्थेची संवादिनी वडिलाचा पत्ता शोधत गेली. पण दोन महिन्यांपूर्वीच मीराचा पूर्ण परिवार गाव सोडून गेला होता.

 मीराएवढी लहान मुलगी आजवर संस्थेत आली नव्हती. तिचा बालसुलभ अवखळपणा दिलासाघराला ...मम्मीला ताजवा देत असे. पण कधी ती तापही होई. बाजारची भजी खाण्याची चटक कार्यकर्तीला नेहमी वैताग आणि ही बाजार करुन बाहेरून आली की कुठेतरी भज्यांचा पुडा खोचून ठेवणार. स्वत: खाणार नि खाणाखुणा करुन इतरांनाही खाऊ घालणार. आमच्या शिस्तप्रिय आणि कडक कार्यकर्त्याच्या दृष्टीने हा गुन्हा महाभयानक. मग जेवण न देण्याची शिक्षा केली जाई. मीराही इतकी हेकेखोर की ताईनी-कार्यकर्तीने 'जेव' म्हटल्याखेरीज घास तोंडात घालाणार नाही. पुस्तकी शिस्तीपेक्षा मायेचा मऊहात अधिक महत्वाचा असतो हे कार्यकर्तीला समजाऊन सांगताना माझी तारांबळ उडे. त्यातूनच मग मीराला माझ्याकडे ठेवण्याचा निर्णय घेतला. राखी पोर्णिमेला निरंजन ओवाळून, साग्रसंगीत राखी बांधण्याचा कार्यक्रम फक्त दादाभैयापुरताच नसे. तर आमच्या बालसदनच्या मुक्तारला ही सन्मानाने राखी बांधली जाई.

 पेपर वाचण्याचाही नाद होता. पुण्याला कोणते सिनेमे लागलेत ते या बाईला माहीत असत. त्यातूनच तिला चौथीला बसवण्याचे मला सुचले. आणि पहिल्या वर्गात पासही झाली. मीराचा मामा तिला भेटला नसता तर कदाचित ती आणखी शिकली असती. मीरा आसाममध्ये असताना सविता दीदींच्या सुखवस्तू घरात राहिली. सुशिक्षित आणि स्त्रीपुरुष समतेचा विचार स्वीकारलेल्या घरात तिला स्वतंत्र व्यक्तिमत्व मिळाले. तरूणाईच्या

आपले आभाळ पेलताना/३५