पान:आपले आभाळ पेलताना.pdf/३८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

उंबरठ्यावर पहिले पाऊल ठेवताना सुखी संसाराचे चित्र जवळून पाहिले. त्यामुळे त्या अधमूऱ्या वयात तिच्या मनात सुखी संसाराबद्दल, प्रियकर..साथीदाराबद्दल सुंदर स्वप्ने पेरली गेली. लातूरला झोपडीतले दरिद्री जीवन जगताना मुर्तुझासारखा दिसण्यात तेज, थोडाफार शिकलेला, तिच्या सौंदर्याची स्तुती करणारा मित्र भेटला. परंतु त्याने चार दिवस तिच्या सौंदर्याचा उपभोग घेऊन तिला सोडून दिले. एका बाजूने पारंपारिक संस्कारांच्या मुशीत वाढलेल्या मीराला हा धक्का सहन झाला नाही. आईवडिलांकडे परत जाण्याची हिंमत झाली नाही. दिलासाघरातल्या वातावरणात ती आरपार रमली होती. मीराला निरोप देताना आम्ही सारेच आतल्या आत हेलावलो होतो.

 कोणत्याही संध्याकाळी मीरा आठवते. नि मनात येते, मीराच्या हातातल्या चुडियाॅं कनखत असतील का? तिचा सजन तिला सापडला असेल? की उजाड शुष्क डोळ्यांचे बिगवांगड्यांचे हात दारोदारची धुणीभांडी करण्यात निष्पर्ण, राठ, भेगाळ बनत चालले असतील ?

आपले आभाळ पेलताना/३६