पान:आपले आभाळ पेलताना.pdf/३५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

बदली झाली होती. ती चार दिवसांनी गावाला जाणारं होती. तिनेच तुम्हाला फोन केला नि मला संस्थेत आणले. लई उपकार केले बाबा!"

 अशी होती मीराची कहाणी. उच्चमध्यमवर्गीय कुटुंबातील राहाणीमान अंगी पडल्यामुळे मीराला इतर मुलींच्यात मिसळाणे जमत नसे. खेडयात वाढलेल्या इतर स्त्रिया डोक्याला पचपचून तेल लावीत. तर या बाई साहेब नहायच्या आदल्या रात्री खास तेल लावाणार. दिलासातील महिलांना हाताखर्चासाठी संस्था शंभर रुपये देते. पण तेही तिला अपुरे वाटत. मुलगी वा बाई दिलासात रुळली की आम्ही त्यांना गटाने खरेदीसाठी, उदा. भाजी आणणे वगैरे साठी पाठवीत असू. त्यांच्यातील आत्मविश्वास वाढावा, संस्थेविषयी आस्था निर्माण व्हावी, निर्णय घेण्याची क्षमता यावी हा यामागे हेतु होता. एक दिवस तक्रार आली की मीरा भाजीला गेली की हॉटेलमध्ये चहा पिण्याचा हट्ट धरते आणि ताईलाही नेते. लहान गावात विशिष्ट १-२ उपाहारगृहे सोडली तर स्त्रिया हॉटेलमध्ये जात नाहीत. छोट्या गावात सगळे सगळ्यांना ओळखतात. हॉटेल मालकाचाच एक दिवस फोन आला "भाभी पोरीची नजर चंचल वाटते. तिला सांभाळा. उगा आफत यायची. लोक काय वाईटवरच असतात. मी मुद्दाम फोन केला."

 एरवी मीरा इतकी गोड, हुशार, बोलण्यात तरबेज. वाचनाची आवड. काय करावे हे सुचेना. आमच्या एका कार्यकर्तीने सुचवले तो मीच तिला कामासाठी घरी ठेवावे. माझ्या मुलीबरोबर तिची दोस्ती होतीच. सायंकारी जेऊन खाऊन दिलासात परतावे. त्या बदल्यात मी जेवण, कपडे वगैरे देऊन दीडशे रुपये तिच्या नावे बँकेत भरावेत. घरगुती वातावरणात ती अधिक स्थिर होईल. मीरा मला घरात मदत करी. घर स्वच्छ ठेवणे नि मला स्वयंपाकात मदत करणे एवढेच तिचे काम. दुपारी २ ते ४ संस्थेत शिवण शिकायला मी पाठवीत असे. १९९० साल 'युनोने' बालिका वर्ष म्हणून जाहीर केले. त्या निमिताने बालिका मेळावे घेतले. त्यात मीरा पुढे असे. अंताक्षरीत तर कोणालाच हार जात नसे.

 केव्हातरी बाजारात जाताना तिला तिचा मामा भेटला. त्याने नंतर संस्थेत पत्र पाठवले. मीराची आई सावत्र तर नव्हतीच तर सख्खी होती. मुर्तुझाबरोबर पळून गेल्यावर ती परत घरी कधी गेलीच नव्हती. आम्हाला सांगितलेल्या माहितीतल्या अर्ध्या गोष्टी खोट्या होत्या. एक दिवस सायंकाळी

आपले आभाळ पेलताना/३३