पान:आपले आभाळ पेलताना.pdf/३३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

नाव किनाऱ्याला लागली. मालकिणीचा भाऊ आला. सर्व पसारा आवरून बहिणीला आणि मुलांना घेऊन धारवाडमध्ये निघून गेला. लातूरला परतण्याशिवाय लक्षमणसमोरं दुसरा मार्ग नव्हता. त्यात मोठ्या शान्ताने असमिया टेलरबरोबर पळून जाऊन लग्न लावले होते. तिच्याहून धाकटी मीरा शहाणी होऊन तीन वर्षे झाली होती. सविता दीदींच्या घरचे चांगलेचुंगले खाणे, नीटनेटके कपडे यामुळे ती अधिकच उठून दिसे. शान्ताच्या मार्गाने ही लेक पण गेली तर कसे ? असा प्रश्न मनाला सतावत राही. त्यामुळे फारसा विचार न करता लक्ष्मणने निर्णय घेतला आणि एक दिवस त्याने सगळा गाशा गुंडाळून थेट लातूर गाठले. सिग्नल कॅंपात एका कोपऱ्यात मित्राच्या मदतीने झोपडे ठोकले आणि सारेजण राहू लागले. आसामात भात आणि मासे मुबलक. दोनवेळचे खाणे सहज भागे. पाण इथे मात्र महागाई प्रचंड वाढलेली होती. हायब्रीडची भाकर नि एक कालवण खायचे तरी परवडत नसे. इथेही मीरा, रत्ना, पद्मिनी, माया, वीणा धुणीभांडी, झाडलोट करायला चार घरी फिरत. आई नऊ बाळंतपणांनी पार खंगली होती. नेहमी खोकला येई, थकवा येई. घरची कामे धाकट्या रेखा आणि मीनू सांभाळीत. मीराच्या झोपडीशेजारच्या बंगल्यात टेक्निकल शाळेची तरुण पोरे राहात. त्यांच्या धुण्याभांडयाचे काम मीरा करी. त्यातच मुर्तुझा होता. मुलांना अधूनमधून 'तिखट' आवडे. मीरा ते बनवण्यात तरबेज होती. पोरं तिच्यासमोर सामान आणून टाकत. मनापासून खपून ती झाआट कालवण तयार करी. पोरं खुश. नि शिवाय उरलेला शेरवा, भात, चपात्या घरी न्यायला मिळत. मीराही खुश. सवितादीदीच्या हाताखाली मीरा कालवाण करण्यात तरबेज झाली. तिची स्वच्छ आणि आधुनिक राहणी, बोलण्यातला गोडवा यामुळे ती भल्या घरातली मुलगी वाटे.

 मीराचे केस कुराळे नि दाट होते. डोक्यावरून पाणी घेण्याची सवय आसामात लागलेली. मोकळे केस पाठीवर टाकून हिंडणारी.... काम करणारी मीरा अनेकांच्या नजरा वळवून घेई. त्यातच मुर्तुझा होता. तो तिला डोक्याच्या पिना, डोळ्यात घालावयाचा सुरमा, भिवया रेखायची पेन्सील, पावडर इत्यादी खास वस्तू आणून देई. मग घरात दुसरी पोरं नसतील तेव्हा त्याचे हट्ट मीराला पुरवावे लागत. सवितादीदीच्या घरात वाढल्याने स्त्रीपुरुष मैत्रीतले नेमके धोके तिला माहीत होते. ती शहाणी झाल्यावर दीदींनी तिला चार गोष्टी समजावून सांगितल्या होत्या. चित्रं दाखवली होती. मुर्तुझाचे बारीकसारीक हट्ट पुरवताना एक दिवस आईनेच पाहिले. त्या रात्री वडिलांनी


आपले आभाळ पेलताना/३१