पान:आपले आभाळ पेलताना.pdf/२९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

उत्सुकता शिगेला पोचली. दरम्यान तो मुलगा क्लासमध्ये येईनासा झाला. एक दिवस खोटे कारण सांगून, लिली जी महिला आम्ही दुसऱ्या घरी पाठवली होती तिला भेटण्याचे निमित्त करुन चिंचवडला जाऊन आली. पण तिथेही पता लागला नाही. तिथेच नसीम चाचा... दाढीवाला माणूस भेटला. त्याने वडिलांना भेटवण्याची खात्री दिली. शब्बीरमियाँची बदली मध्यप्रदेशात झाली होती असे तो सांगे. पण त्याच्या बरोबर एकटीने जाण्याची हिंमत लिलीने केली नाही. नसीम चाचा तिचा पत्ता शोधत घरी येऊन गेले. साहेबांना आणि वहिनींना सांगून ते लिलीला घेऊन मध्यप्रदेशात जाणार होते. पण ते यायचे ते नेमके दुपारी, जेव्हा हे दोघे कामावर गेलेले असत. तिसऱ्यांदा चाचा येऊन गेल्यावर मात्र लिलीला परत पाठवण्याचा निर्णय त्या कुटुंबाने घेतला. लिलीच्या मनात मात्र आता वडिलांना...भावाला...बहिणींना भेटण्याची जबरदस्त आकांक्षा निर्माण झाली होती. दिवाळीत पपांना खामगावला भावाकडे पोचवले, लिलीच्या मनाचा विरंगुळाही संपला होता. पपांचे सारे वक्तशीर करण्यात ती हौशीने बुडून जात असे. पुन्हा एकदा अब्बांना भेटण्याची ओढ मनाला लागली. एक दिवस सकाळी केन्द्र संवादिनीचा फोन आला की लिलीला पुण्याला जायचे आहे. तिला अब्बांचा शोध घ्यायचा आहे. आम्ही आमच्या परीने त्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न केले होते. पण शोध लागत नव्हता. तीही आता कंटाळली होती. वयाची तिशी ओलांडलेली जबाबदार तर होतीच. तिने रीतसर विनंतीपत्र लिहून दिलं आणि ती पुण्याला गेली.

 सुमारे दोन वर्षानंतर बारामतीच्या स्वीकारगृहाच्या व्यवस्थापिकाताई लिलीसह संस्थेत आल्या. त्यांचे बंधू अंबाजोगाईला नोकरीला आहेत. त्या अंबाजोगाईत येणार म्हटल्यावर लिलीनेही आग्रह केला इकडे येण्याचा. मनापासून भेटायला आली. गळा पडून भेटली. इथून गेल्यावर ती चिंचवडच्या स्टेशन मास्तरना भेटली. पण त्यांनी दोन वर्षांपूर्वीच हे कुटुंब मध्य प्रदेशातील लहानशा गावी बदलून गेल्याचे सांगितले. इतक्या दूर जाणे शक्य नव्हते. ती.पुण्याच्या पोलिस स्टेशनमध्ये गेली. तिथून तिला बारामतीच्या स्वीकारगृहात पाठविण्यात आले. तिथल्या ताईंचा अनुभव आमच्यासारखाच. त्यांनी तिला परिचारिकेचे शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. पण ती तेथे टिकू शकली नाही. वागायला अत्यन्त मायाळू, साधी. बोलण्यात गोडवा. कुणाशीही वाद न घालणारी वा भांडणारी. पण मनाने खूप खूप थकलेली लिली. तिच्या भविष्याची काळजी

आपले आभाळ पेलताना/२७