पान:आपले आभाळ पेलताना.pdf/२८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आहेत.

 लिली त्या कुटुंबातील वृद्धांची सेवा अत्यन्त प्रेमाने, मायने करी. घरात स्वयंपाकासाठी वेगळी महिला होती. पण हक्वाने त्यांना आवडणारे पदार्थ स्वतः तयार करुन खाऊ घाली. सारे कसे छान चालले होते. पण अचानक एक दिवस एक अनोळखी माणूस लिलीची चौकशी करीत घरी आला. आठ पंधरा दिवसांनी त्याची खेप होई. दुपारच्या वेळात घरी लिली आणि दोन वृद्ध माणसेच असत. लिलीला समजावून सांगितले. त्या गृहस्थाविषयी माहिती विचारली. पण लिली फक्त मान खाली घालून बसे. नाईलाजाने दोघे पती-पत्नी स्वत: लिलीला पोचवण्यासाठी संस्थेत आले. त्या वेळी दिलासा घरात आठ जणी राहात होत्या. तिथे जागा नव्हती. माझ्या घरी माझे वडील... पपा, अपंग होऊन झालेले होते.

 ... आमच्या घरात एक जुनी लाकडी खुर्ची होती. ती घराबाहेरच्या ओट्यावर ठेवलेली असे. सायंकाळी तिच्यावर बसून पपा वाहत्या रस्त्याकडे बघत बसत. डोळ्यांनी वाचता येत नसे. अंधूक दिसे. त्यात पंचावन्न वर्षे संगत देणारी सखी नुकतीच निघून गेलेली. मग वेळ पळावा कसा? तो रस्त्याकडे पाहात पळवीत असत. थंडी संपत आली. फाल्गून सुरु झाला. होळी जवळ येऊ लागली. आपल्या लाडक्या खुर्चीचा बळी जाऊ नये म्हणून पपा खुर्ची उचलायला गेले नि पडले. कमरेचे हाड निकामी झाले. सतत भिरभिरणारी पावले पार आडवी झाली होती.

 पपांकडे लक्ष द्यायला, त्यांना पेपर वाचून दाखवायला, वेळेवर जेवण वाढायला मायेची व्यक्ती जवळ हवी होती. मग लिली माझ्या घरी येऊ लागली. राहायला मात्र केंद्रावर जाई. कारण तिथे मम्मी, इतर मैत्रिणी होत्या. लिलीच्या मनाचे दरवाजे या काळात अधिक जवळिकीने ठोठावणे शक्य झाले. मूल एकाकी... एकटे... कुठेही नि कसेही वाढले तरी त्याच्या हृदयस्थ गाभ्यात आई आणि वडिलांबद्दल नितान्त उत्सुकता व कोवळीक असते. लिली टायपिंगच्या क्लासला जात असे. तिथे एक मुलगा लिली वाढली त्या कोल्हापूरच्या परिसरात वाढलेला होता. ओळखीतून विशेष आस्था वाढली. त्यातून कळले कि अब्बा सेवानिवृत्त झाले आहेत. अम्मा दहा वर्षापूर्वीच अल्लाकडे निघून गेल्या. आणि मोठा भाऊ शब्बीरमियी चिंचवड रेल्वेस्टेशनवर अब्बांच्या जागेवर काम करतो. अर्थातच लिलीच्या मनातील

आपले आभाळ पेलताना/२६