पान:आपले आभाळ पेलताना.pdf/२७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तिथे राहिल्यावर तिची रवानगी लातूरच्या स्वीकारगृहात झाली. लातूरच्या स्वीकारगृहातील बहुतेक महिला गुन्हेगारी प्रवृत्तीची शिकार असलेल्या वा होणाऱ्या कौटुंबिक त्रासामुळे मानसिक संतुलन बिघडलेल्या महिला असाव्यात. तिच्या आणि पार्वतीच्या बोलण्यातून हे लक्षात आले. तसेच पार्वतीला दिलासात घेऊन येणाऱ्या स्वीकारगृहाच्या व्यवस्थापिकेच्या मनांतील खंतही जाणवली. लिली या व्यवस्थापिकेच्या पूर्वी काम करणाऱ्यांच्या घरी मदत करत असे. त्यामुळे तिचा वेळ बरा जाई. नव्या व्यवस्थापिकाबाईना वाले की या अबोल, शहाण्या आणि वंचित मुलीला जगाच्या मुख्य धारेत सहभागी होण्याची संधी मिळावी. त्या हेतूनेच त्यांनी पार्वती आणि लिलीला दिलासात आणले.

 लिलीच्या म्हणण्यानुसार ती मॅट्रिक नापास असली तरी तिची झेप जेमतेम पाचवी इयतेची होती. वाचनाचा नाद नव्हता. पण टायपिंग शिकण्याचे वेड, हो... वेडच म्हाणावे लागेल, होते. त्यातूनही मराठी टायपिंग अजिबात आवडत नसे. ए बी सी डी टाईप करण्यात दिवसाचे पाच-सहा तास जात. या वेडातून इंग्रजी शिकण्याकडे तिची प्रवृत्ती वाढेल, त्या निमिताने १० वी पास होण्याचा ध्यास तिच्या मनांत घुसवता येईल असे आमच्या संवादिनींना वाटे. पण लिलीची गाडी चार दोन शब्द आणि ए बी सी डी यापुढे कधी सरकलीच नाही. पुण्यातील आमच्या ... मनस्विनीच्या मैत्रिणीकडे, तिच्या वृद्ध आईला सोबत देण्यासाठी तसेच त्यांची काळजी घेण्यासाठी एक निरक्षर दिलासा-कन्या पाठवली होती. ती तिथे केवळ रमली नाही तर साक्षर झाली. आणि समाजवादी महिला सभेत जाऊन बाहुल्या करण्यास शिकली. दिवसातून दुपारचे तीन तास ती केंद्रावर जाई. आमची मैत्रीण तिच्या नांवाने तीनशे रुपये बँकेत जमा करीत असे. हात खर्चासाठी शंभर रुपये देई. शिवाय ती घरातली एक सन्माननीय सभासद होती. या मैत्रिणीच्या बहिणीकडे तिच्या वृद्ध मायपित्यांची काळजी घेण्यासाठी, त्यांना वर्तमानपत्र वाचून दाखवण्यासाठी एका गरजू महिलेची आवश्यकता होती. आम्ही लिलीशी चर्चा केली. लिलीलाही बदल हवाच होता. त्या कुटुंबाशी चर्चा करताना तिच्या मनातील टायपिंग विषयीच्या कमालीच्या आवडीबाबात सांगितले होते. त्यांच्या घरी टाईपरायटर तर होताच. परंतु लिलीला टायपिंगच्या क्लासमध्ये घालण्याची विनंतीवजा अटही आम्ही घातली. ती त्यांनी प्रेमाने स्वीकारली. लिली आनंदाने पुण्याला गेली. पाचसहा महिने बरे गेले. आणि एक दिवस अचानक फोन आला की लिलीला घेऊन मंडळी येत

आपले आभाळ पेलताना/२५