पान:आपले आभाळ पेलताना.pdf/२४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पाण विचारणार कोणाला ? वर्गातल्या मुली तर निव्वळ चिंटुकपिंटुक वाटत. तशात खालच्या मजल्यावरच्या सिंधीण मावशीची पुतणी रेणू नाशिकहून दोन महिन्यांसाठी राहायला आली होती. तिची नि लिलीची अगदी घट्ट मैत्री जमली. चौथीतून पाचवीत जातांना दुसऱ्या नंबरने उत्तीर्ण झालेल्या लिलीचे लक्ष पुस्तकातून उडत चालले. रेणूच्या गप्पा खूप निराळ्या आणि चवदार असत. त्या सारख्या आठवत. मग पुस्तकातली अक्षरे दिसेनाशी होत. दोन महिन्यांसाठी आलेली रेणू काकीला मदत करण्यासाठी तिथेच राहिली. तिने आठवीनंतर शाळा सोडून दिली होती. सातवीत असतांनाच तिचे एका वर्गमित्रावर प्रेम जडले होते. तो पण खूप प्रेम करी. इतके की त्याने कंरंगळीचे रक्त काढून तिचा भांग भरला होता. एका संध्याकाळी बागेत त्याने शपथ घेतली होती. आता तो जर ब्लेडने करंगळीतून रक्त काढतो तर मग रेणूनेही त्याला गोड मुका दिला होता. एक दिवस त्याची चिठ्ठी दप्तरात सापडली नि रेणूची शाळा बंद झाली. तिला घाटकोपरच्या काकीकडे पाठविण्यात आले. राणूच्या नादात लिलीचे अभ्यासातून तर लक्ष उडालेच पण शालूमावशीही तिला आवडेनाशी झाली. गणितात नापासचा शिक्का घेऊन लिली सहावीत गेली. मुळात लिलीचा रंग गव्हाळ. लांबट डोळे. घनदाट पापण्या. चेहेऱ्यावर नवथर कोवळेपणाची तकाकी चढू लागली होती. शालू मावशीला वाटे इतक्या दुरून पोरीला आणलं. तिला दहावी नंतर नर्सिंगला पाठवावं. पायावर उभं करावं. तात्यांना एका मित्राला गणित आणि इंग्रजी लिलीला शिकवण्यासाठी विनंती केली. काकांनी तात्काळ मान्य केली. काका दुपारी तीन ते चार येत. जीव तोडून शिकवत पण लिलीचे लक्ष रेणूच्या हाकेकडे असे. काकांचा त्रास कसा चुकवावा हे तिला कळेना. ती युक्ती पण रेणूनेच शिकविली. एक दिवस लिलीने मुसमुसत....संतापत काकांबद्दल मावशीजवळ तक्रार केली. काका तिचा हात गच्च दाबतात. नको तिथे हात लावतात. एक ना दोन. शालूमावशी बिथरली. तिने एक शब्द वेडावाकडा न बोलता शान्तपणे काकांना उद्यापासून येऊ नका असे सांगितले. ती तात्यांकडेही सारखे लक्ष ठेवी. लिली नि रेणूचे भटकणे तिने बंद केले. तरीही दुपारच्या वेळात लिली शेजाऱ्यांच्या नजरा चुकवून रेणूबरोबर फेरफटका मारीच. रेणूचा मावसभाऊ सत्येनचे कापडाचे दुकान सिंधी बाजारात होते. सत्येन त्याच्या आईचा एकुलता एक बेटा. नववीपर्यंत कसाबसा गेलेला. नंतर दुकानाकडे पाहूं लागला. पोरीसोरींकडे पाहाण्याची, सारखे बाहेर फिरण्याची सवय तारूमावशीने हेरली. पोराने घाणेरडे सिनेमे पाहू नयेत. दुकानात लक्ष घालावे असे तिला वाटे. पण याचा धिंगाणा

आपले आभाळ पेलताना/२२