पान:आपले आभाळ पेलताना.pdf/१७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

माहीत. ही वही दिराच्या हाती पडली.आणि तिची रवानगी माहेरी झाली. सहा महिने झाले तरी न्यायला कोणी आले नाही म्हणून ही सासरी आली पाण तिला घरात घेतले नाही. बारा दिवस रस्त्यावर नि शेजारच्या ओट्यावर काढले. 'भूमिकन्या मंडळा' च्या बैठतीस ती आली असल्याने संस्थेत आपाणहून आली. आज जेवण्याच्या डब्यांचा व्यवसाय करणारी वंदना स्वयंसिध्दपणे उभी आहे. दोन खोल्याच्या स्वत:च्या घरात सन्मानाने राहाते आहे. ती गोकुळला वकील करणार आहे तिन अर्जुनला भ्रष्टाचार न करणारा इंजिनियर बनवायचे आहे. कमल आपल्या अंपंग अंगदला बारावीनंतर दुकान घालून देणार आहे. शालन आपल्या मनीषाला नर्सिंगला घालाणार होती पण चांगला मुलगा सांगून आला. त्याने बारावी पास झालेल्या मनीला मागणी घातली. पुढे शिकवणार आहे. शालनची बालवाडी सुरु आहे.

 ...अशा या अनेकजणी. अवघ्या पंचविशीत आयुष्याचे धिंडवडे होतांना आतल्या आंत करपणाऱ्या. पण त्यांच्या मनांतही इवलीशी स्वप्ने आहेत. आपली स्वप्ने साकार करण्याची उमेद त्यांना देण्याची शक्ती आहे समाजाजवळ? किंवा संस्थेजवळ?

 शारदाच्या नवऱ्याने पत्नीला स्वत:च्या व्यसनासाठी बाजारात बसविण्याचा प्रयत्न केला. सातवीपर्यंत शिकलेली शारदा नवऱ्याने पाठविलेल्या गिऱ्हाईकाची शिकार बनली. पण दुसऱ्या क्षणी तिथून माहेरी निघून गेली. माहेरी तरी कोण होतं? विधवा आई. मग सहा महिने 'दिलासा'त होती. शारदाचा नवरा दारू प्यायला की पशू होत असे. शुध्दीवर असतांना मात्र शारदावर खूप प्रेम केले होते. त्या प्रेमाच्या आठवणी ती विसरू शकत नव्हती. भावाच्या,आईच्या रेट्यामुळे ती कोर्टात गेली. कोर्टातून काडीमोड घेतला. पण तरीही मन त्याच्यातच घुटमळत होतं. ती प्रौढ साक्षरता वर्गाची शिक्षिका झाली. आईकडे राहू लागली. एक दिवस ढगेबाईनी बातमी आणली की शारदा नवऱ्याबरोबर राहू लागली आहे! आम्ही चक्रावून गेलो. दोन चार दिवसांत शारदा स्वतः आली.

 ... "मी नवऱ्याबरोबर राहण्याचं ठरवलं आहे. त्यांनी दारू सोडलीय, नि गाव सोडून ते इथंच राहायला तयार आहेत. इथेच काहीतरी काम करतील. मी पण कष्ट करीन. त्याना पश्चात्ताप झालाय. कसं करू मी? तुमचाही धाक राहील." शारदाने सांगितले.....आणि गेले वर्षभर दोघंही सुखाने राहात

आपले आभाळ पेलताना/१५