पान:आपले आभाळ पेलताना.pdf/१६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 "बाई, तुमचं कारड मिळालं. वाटल लेकरू डोळ्यांनी बघावं. ती काई वळणावर येण्यातली राहिली नाही. तिच्या भावांना न सांगता झालोय मी. पण भेट नसिबात नाही. चिमणीचं पिल्लू घरट्यातून खाली पडलं की त्याला पुन्ना घरट्यात घेत नाहीत...." बोलता बोलता म्हाताऱ्याचा आवाज घुसमटून गेला.

 अनेकजणी आल्या. पण या पोरीची आठवण झाली की मन आतल्या आत चिरत जातं. आपल्या मर्यादा खुपायला लागतात.

 हे काम खूपदा चटकेही देते. आपल्या आसपासची, सहकारी जनांच्या घरची प्रकरणे हाताळतांना जवळच्यांची नाराजी पत्करावी लागते. द्वेशही सहन करावा लागतो. घरच्या मुलांना, कार्यकर्त्या मुलींना त्रास सहन करावा लागतो. पण या टोचत्या उन्हातही एक हलकीशी सरही सरसरून जाते. जेव्हा ती मदत केलेली महिला चोरुन भेटते नि हात घट्ट धरुन सांगते, "ताई, लई उपकार वाटून घेतलेत हो. माज्या लेकरासाठी जिवंत राहायचं बळ दिलंत." अशा प्रसंगातून कर्ते सुधारक आणि बोलके सुधारक यांचेही दर्शन घडते.

 शांता तीन मुलांची आई. लोकसतेतील मधुवंती सप्रेचा लेख वाचून, तिचे पोस्टातील बंधू संस्थेत आले. तिच्या दोनही मुलांची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. शांता शिवाणकाम, खडू, निर्धुर चुली बनविण्याचे तंत्र शिकली. इंग्रजीचा अभ्यास मन लावून करी. ती आज स्वत:च्या पायावर सन्मानाने उभी आहे. मुलंही मोठी झाली आहेत. पण तिने टाकलेला प्रश्न अजूनही सतावतो.

 .... ताई,नवऱ्याला जशी बायको लागते, तसा बाईलाही नवरा हवासा वाटतोच की तुमीच म्हणता ना की बाई माणूस आहे.?... - या प्रश्नासाठी कोणते उत्तर आहे आमच्याकडे?

 ... हरिणीच्या डोळ्यांची, आदबशीर वागणारी वंदना अवघी पंचविशीतील पोर. दोन मुलग्यांची आई. अठरा हजार हुंडा नि दोहो अंगानी खर्च देऊन हिचे लग्न भरपूर पाणथळाची शेती असलेल्या अडाणी पाणथळाशी लाऊन दिले. दीर इंजिनिअर, सरकारी नोकर. शेतीत कष्ट करणारा हिचा नवरा आणि माल वविकणार दीर. हिने एका वहीत हिशेब ठेवला. तो असा. दोनशे पोती हायब्रीड, पन्नास पोती तूर, चाळीस क्विंटल कापूस... आणि किंमत? दादांना

आपले आभाळ पेलताना/१४