पान:आधुनिक आहारशास्त्र.pdf/३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
अन्नाचे महत्त्व

शास्त्रीय दृष्टया चांगला ठरेल तो ज्याप्रमाणे कांहीना पैशाच्या कमतरतेमुळे मिळत नाही, त्याचप्रमाणे कांहीना धर्माची अडचण आड येते. या अडचणीला किती महत्त्व द्यावें, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. धर्मात उपोषण केल्याने पुण्य लागते,तेव्हा कोणत्याही रीतीने अपुरें अन्न खाल्ल्याने थोडें बहुत पुण्य लागेल हे निर्विवाद आहे, परंतु क्लेश सोसल्याने पुण्य लागते असे ज्यांस वाटत नसेल,त्यांस दोन शब्द सांगणे अस्थानीं होणार नाही. ज्यांचे संस्कृत वाक्यांनी समाधान होत असेल, त्यांनी ‘जीवो जींवस्य जींवनं’ या वाक्याचा विचार करावा. मांसाहारात हत्या होते आणि शाकाहारात होत नाही अशी ज्यांची कल्पना असेल त्यांना इतकेच सांगणे आहे की प्रसिद्ध शास्त्रज्ञ बोस यांनी वनस्पतींनाही प्राण्यासाररख्याच संवेदना होत असल्याचे सिद्ध केले अहि. झाडे कापली असतां ती ओरडत नाहीत म्हणून ती हत्या नाही, असे म्हणायचे असेल तर मासे देखील ओरडत नाहीत हे लक्षांत घ्यावें, आणि प्राणि मारण्यांत क्रूरता आहे ही ज्यांची अडचण असेल,त्यांनी हाहि विचार करावा की मासे केवळ पाण्यातून काढल्याने मरतात, त्यांना मारावे लागत नाही. परंतु या सर्वांपेक्षां अधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही, की मरणाऱ्या प्राण्याला वेदना होत असतील या समजुतीने मनांत भूतदया येणे जरी काही अंशी स्वाभाविक आहे, तरी या बाबतीत भूतदया म्हणजे अविचार आहे. विचार करतां हे कबूल करणे भाग पडेल, की जीवनकलहात मनुष्याला इतर प्राण्यांविरुद्ध झगडावें लागते, आणि मनुष्याला त्रास देणाऱ्या प्राण्यांचे बाबतीत जैनांशिवाय इतर लोक भूतदया दाखवीत नाहीत, आणि मग हत्या म्हणजे पापही समजत नाहीत. निरुपद्रवी प्राण्यांच्या बाबतीत मात्र कांही लोक भूतदया पुढे आणतात. परंतु सर्वांनी मांसाहार सोडून दिला अशी कल्पना केली तर या निरुपद्रवी प्राण्यांची संख्या इतकी वाढेल की मनुष्याला पृथ्वीवर उभे रहायला जागा उरणार नाही, कारण नैसर्गिक स्थितीत या प्राण्यांचा संहार करणारे जे हिंस्र पशु असतात,त्यांना मात्र आपण मारतो, आणि संहार करणारा कोणी न राहिल्यास थोड्याच वेळात सर्व जग व्यापण्याची शक्ति अगदी यःकश्चित प्राण्यांत देखील असते, हे कोणताही जीवशास्त्रज्ञ सांगेल. तेव्हा मनुष्याने स्वसंरक्षणार्थ तरी

२५