पान:आधुनिक आहारशास्त्र.pdf/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
आहारशास्त्र

आश्चर्य हे की परिणाम बरोंबर उलट झाला. ज्यांना चांगली घरे मिळांली त्या गटांतील मृत्युसंख्या वाढली आणि जुन्या घरातील लोकांची जवळजवळ कायम राहिली. म्हणजे नव्या घरांनी फायदा होण्याऐवजीं नुकसान झाले. याचे कारण शोधूं जातां असे समजले की ज्यांना चांगली घरें मिळाली त्यांना भाडें जास्त भरावे लागले,आणि अन्नावर खर्च कमी करणें भाग पडले, म्हणून त्यांची मृत्युसंख्या वाढली.यावरून हें स्पष्ट होते की चांगल्या जागेंत अपुरे अन्न मिळण्यापेंक्षां वाईंट जागेत योग्य अन्न मिळालेले बरे.यावरून इतर सर्व गोष्टीपेक्षां अन्नाचे महत्त्व किती आहे याची कल्पना येईल.
 मनुष्याला पुरेसे अन्न न मिळाल्यास त्याच्या हातून पुरेसे काम होत नाही.त्याची शक्ति, उत्साह, एकंदर प्रकृत्ति आणि त्याबरोबरच कामवासना खालावतात. यासंबंधी एक आपोआप घडलेला मोठ्या प्रमाणावर प्रयोग गेल्या महायुद्धांत युरोपात पहायला मिळाला, कारण युद्धामुळे त्यांना पुरेंसें अन्न मिळाले नाही आणि त्यांच्या शक्तीचा ऱ्हास होत गेला. हिंदुस्थानात देखील ही गोष्ट स्पष्ट दिसते की ज्या जाती सैन्यांत भरतीला योग्य समजतात, म्हणजे ज्यांच्यांत ताकत आणि कणखरपणा जास्त असतात,त्यांचे अन्नइतरांपेक्षा अधिक चांगले असते.हिंदुस्थानासारख्या गरीब देशांत सर्वांस चांगले अन्न मिळणे शक्य नाही,आणि याचे कारण पारतंत्र्य एवढे एकच नाही. कारण येथील लोकसंख्येस पुरेसे अन्नच येथे उत्पन्न होत नाही, आणि ते परदेशातून आणण्यास पैसे नाहीत. आज सर्व जग एकत्र घेतले तरी हीच स्थिति दिसते, की सर्वांस पुरेंसे अन्न उत्पन्न होत नाही. अशा स्थितीत योग्य अन्न म्हणजे काय हे ठरवले तरी देखील ते सर्वांस मिळणार नाही. यावर उपाय काय हा आहारशास्त्राचा विषय नव्हे. परंतु प्रथमयोग्य अन्न म्हणजे काय हे ठरवणे आहारशास्त्राचे काम आहे. मग ज्यांना ते मिळणे शक्य नाही त्यांनी काय केले असतां कमी नुकसान होईल हे पाहतां येईल.

 येथे आणखीही एका गोष्टीचा विचार करणें जरूर आहे. शास्त्रीय विचारात वास्तविक धर्म, नीति वगैरे अवांतर गोष्टींंचा विचार येतां नये,परंतु जो आहार

२४