पान:आधुनिक आहारशास्त्र.pdf/३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
अन्नाचे महत्त्व
-----०-----

अन्नाचे बाबतीत कित्येक लोक अत्यंत निष्काळजी असतात, आणि कोणी त्याची विशेष फिकीर केल्यास तो फाजील चोचले करतो असे त्यांस वाटते. अशा लोकांची प्रकृति बहुधा निसर्गतः इतकी चांगली असते को ती प्रयत्नानेही बिघडणें कठीण असते. परंतु या बाबतीत निष्काळजीपणा शेवटी बाधल्याशिवाय रहात नाही. मनुष्याचा नैसर्गिक आहार चालू होता तोंपर्यंत निष्काळजीपणाही फारसा बाधला नसता, कारण बाधणारे पदार्थ खाण्यात येणे किंवा अन्नात कांही घटकांची उणीव असणें जवळजवळ अशक्य होते. परंतु ती स्थिति आतां नाही,तेव्हा समंजस मनुष्याला आहाराचा विचार करणें जरूर आहे. आहारशास्त्र हे अगदी नवीन शास्त्र आहे आणि त्यातील ज्ञान अजून बरेच अपुरे आहे, तरीपण प्रत्येकाला अनुभवाने इतके ठरवतां येते की अमुक पदार्थ आपल्याला मानवतो आणि अमुक बाधतो, आणि ज्याच्या त्याच्या पुरतेइतकेच शास्त्र पुष्कळ उपयोगी होते. परंतु सर्वांना लागू असे कांही नियम काढता येतील तरच ते शास्त्र या नावाला पात्र होईल, आणि असे नियम काढण्याकरितां अन्नाचा शरीराला कसकसा उपयोग होतो, किंवा झाला पाहिजे, हे प्रथम पाहिले पाहिजे. प्रकृतीच्या दृष्टीने मनुष्यला हवाशीर जागा, स्वच्छ पाणी, सूर्यप्रकाश, वगैरेचीही जरूर असते हे खरे. तरी योग्य अन्नाइतके महत्त्व दुसऱ्या कोणत्याही गोष्टीला नाही असे इंग्लंडातआपोआप घडलेल्या एका प्रयोगावरून नुकतेच सिद्ध झाले आहे. हा प्रयोग असा की एका लहानशा शहरातील नगरसमितीने शहरातील घाणेरर्डी घरे पाडून चांगली घरे बांधण्याचें ठरवले, परंतु हे सर्वच काम एकदम करण्यास पुरेसे पैसे नसल्यामुळें निंमे घरे अगोदर हाती घेतली आणि बाकीची पांच वर्षपर्यत तशीच शिल्लक राहिली.म्हणजे घाणेरडया घरांपैकी निंमे लोक चांगल्या घरांत राहायला गेले,आणि निमे जुन्याच घरात राहिले. साहजिकच पहिल्या गटांतील लोकांचे आरोग्य वाढेल असे कोणालाही वाटणे साहजिक आहे. परंतु

२३