पान:आधुनिक आहारशास्त्र.pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
आहारशास्त्र


पाण्यामुळेच योग्य स्थितीत राहतात आणि मलमूत्रविसर्जन सोपें होते.मलमूत्र आणि घाम यांतून शरीरातील टाकाऊ झालेले भागबाहेर जातात, आणि ते शरीरांत राहिले तर घातक होतील.शरीराची उष्णता कायम राखण्यालाही पाण्याचा उपयोग होतो.

 ५ वा प्रकार म्हणजे खनिजद्रव्यें.यांपैकी कांही आपत्या शरीरांत बऱ्याच मोठ्या प्रमाणात असतात, पण कांही अत्यंत सूक्ष्म प्रमाणांत असतात. याचा शरीरास अत्यंत उपयोग असते; याचे अधिक विवेचन पुढे येईल.

 याशिवाय अन्नात ‘व्हिटॅमीन’ नांवाचे पदार्थ असावे लागतात. ते अत्यंत सूक्ष्म प्रमाणात असतात, तरीदेखील ते नसल्यास जीवन अशक्य होते.


----------
२२