पान:आधुनिक आहारशास्त्र.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मनुष्याचा आहार

केलेले गोमांस, वगैरेही पदार्थ होते. परंतु केवळ नैसर्गिक स्थितीतीलच पदार्थ मुलापुढें ठेवले तर असें दिसते की रंग,वास,चव,वगैरे सर्व दृष्टींनी त्यांना आवडणारे पदार्थ म्हृणजे उत्तम पिकलेली गोड फळे होत.केळीं,अननस,संत्री, आंबे, अंजीर, द्राक्षे, पोपये, कलिंगडे वगैरेफळें मुलाना फार प्रिय असतात, आणि मोठ्या माणसांनाही ती आवडत नाहीत असे नाही.मुलांना साखर किंवा मिठाई फार आवडते अशी समजूत आहे,परंतु वस्तुत: त्यांना गोंड फळें न मिळाल्यामुळेंच ती मिळेल तो गोड पदार्थ खातात. हल्ली मुलांना मुसुंब्यांचा रस देतात तो केवळ डाक्तर सांगतात म्हणून. आणि त्याने किती फायदा होतो हे सर्वांना दिसत असूनही कोंणाला अशी कल्पना सुचत नाही की हेच कदाचित् मुलाचे नैसर्गिक अन्न असेल. हा रस औंषयासारखा द्यायचा असतो, अशीच लोकांची समजुत होते पुढे दिलेल्या प्रयोगावरून हेही सिद्ध झाले आहे की मुलाना काय खावें हे समजते, तसेच किती खावें हेही समजते. त्यानीं आपल्या मर्जीप्रमाणे खाल्ले तर ती आजारी पडत नाहीत, किंवा पडलीच तर काही वेगळ्या कारणाने पडतात, कमजास्त खाण्यामुळें नव्हे. अशा रीतीने फ्ळांवर राहणाऱ्या मनुष्याला पाणी फारच कचित् घ्यावे लागते, कारण फळांत पाणी पुष्कळ असतें. पण इतकी फळें मनुष्याला मिळणार कशी आणि तो हा फलाहार करणार कसा ? सामान्य मनुष्याला हें अशक्य आहे आणि हल्ली कोणी अरण्यात जाऊन राहिला तरीही त्याला फळें मिळणे कठिण, कारण वानर झाडावर एक फळ टिकू देणार नाहीत. परंतु मनुष्यही एकदां वानरासारखाच चपळ प्राणि होता आणि इतर सर्व प्राण्यांवर जेव्हा त्याने वर्चस्व मिळविले, तेव्हा त्यालाही झाडावर चढून फ्ळें खातां येत असत. हल्ली एखादा ‘ तर्झन ’ चित्रपटांतच पहायला मिळतो, पण त्यावेळी सर्वच माणसे अशा प्रकारची असली पाहिजेत, असें थोडया विचांरांती दिसेल.
 तें काही असले तरी सर्वांना विपुल फळें कशी मिळणार, हा प्रश्न सुटत नाहीच. मनुष्याला हल्लीची स्थिति येण्यापूर्वीच, म्हणजे वानरावस्थेंतच त्याचे डोके सुपीक झाले होतें. तेव्हा अन्न पुरवठ्यास न आल्यामुळे माल्थस् च्या म्हण

१५