पान:आधुनिक आहारशास्त्र.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
आहारशास्त्र

नव्हे. जे पदार्थ नैसर्गिक स्थितींत मनुष्य आवडीने खाईल, तेंच त्याचें अन्न म्हणता येईल.
 नैसर्गिक स्थित्तींतीलप्राण्यांचे अवलोकन करणे जरीअत्यंत कठिण आहे, तरी त्यासेबेघी इतके मात्र निविंवाद म्हणता येते की मनुष्यात सामान्यतः दिसणारी म्हातारपणाची चिन्हे अशा प्राण्यांंत दिसत नाहीत. असे प्राणि मरेपर्यंत नपुंसक होत नाहीत, आणि अर्थात् म्हातारपणाने मरण्यापूर्वीच त्यांना दुसरा एखादा प्राणि खाऊन टाकतो. तें म्हातारे झाले तरी त्यांची शक्ति बऱ्याच प्रमाणात कायम राहते, असें शिकाऱ्यांच्या अनुभवावरून दिसते. म्हातारपणाच्या ज्या चिन्हाला मनुष्यात अतिशय महत्त्व देतात,तें म्हणजे शरीरातील ग्रंथि व ऱक्तवाहिन्या हृळूहळू कठिण होत जाणे. परंतु असे झाले तरी देखील रानटी प्राण्यांची शक्ति कायम राहते असे दिसते. एका शिकाऱ्याने असे लिहिले आहे की त्याने रानांत एक रेडा मारला, त्याचे मांस इतके कठिंण होते की तें खाता येईंना. पण त्याने मरण्यापूर्वी अतिशय त्रास दिला.फुप्फुंसांतून गोळी जाऊन नाकांतून रक्त वाहू लागले असतानाही त्याने शिकाऱ्यावर चाल केली आणि दुसरी गोळी हृदयातून गेली तरीही पुन: प्रयत्न केला ,पण लगेच मारून पडला. त्याच्या मानेवर आणि खांद्यांवर सिंहाने केलेल्या जखमांच्या खुणा सापडल्या.

 नैसर्गिक अन्नाची शक्ति इतकी आहे की थकलेल्या घोड्याला कांही दिवस विश्रांति व हिरवा चारा दिल्यास तो पुन: फुरफुरू लागतो. तेव्हा नेहमीच असे अन्न मिळाल्यास म्हातारपण लवकर येणारच नाही असे अनुमान काढण्यास काय हरकत आहे?हे नैसर्गिक अन्न कोणतें, हें माणसाच्या बाबतीत ठरवणें मात्र सोपे नाही, परंतु एक गोष्ट आपणास सहज करतां येईल की या बाबतीत कृत्रिम अन्नाचा सराव झालेल्या लोकांच्या आवडीनिवडी पाहण्यापेक्षां ज्यांची रुची अजून बिघडलेली नाही असा लहान मुलांची आवड पहावी,म्हणजे आपल्याला मनुष्याच्या नैसर्गिक अन्नाची थोडीतरी कल्पना येईलं. मुलांवर केलेला जो प्रयोग वर दिला आहे, त्यांत मुलापुढें केवळ नैसर्गिक पदार्थच न ठेवतां धान्याचे पीठ , बारीक

१४