पान:आधुनिक आहारशास्त्र.pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
आहारशास्त्र

ण्याप्रमाणे मरून न जाता अन्नाचा पुरवठा वाढवण्याकरता नाना प्रकारच्या युक्त्या काढल्या आणि त्याला विस्तवाचीही युक्ति सांपडल्यामुळें, ज्याने पूर्वी धान्याकडे तिरस्कारने पाहिले असतें, तो प्राणि आतां धान्ये शिजवून किंवा भाजून खाऊं लागला.कच्चे धान्य किती माणसांना खायला आवडेल? पण ते शिजवून,भाजून,तळून रुचकर लागू लागले, आणि नैसर्गिक प्रेरणा तेथे गप बसली.हा प्रकृतीविरुद्ध पहिला अत्याचार झाला.

  या कृत्रिम मार्गांत शिरल्यावर हा मोठा धोका उत्पन्न झाला,की यापूर्वी आवडेल तें खाण्यांत मनुष्याला योग्य पोषणाची खात्री होती ती आतां नाहीशी झाली,कारण कृत्रिम परिस्थितीत नैसर्गिकप्रेरणांचे काही चालत नाही. त्या वेळी मनुष्याला हा धोका ओळखणे शक्य नव्हते,कारण मनुष्याचे ज्ञान अत्यंत मर्यादित होते. तथापि निसर्ग नियमांना अज्ञानाची सबब कधीच चालत नाही. आणि अन्नातील या फरकामुळें आज मनुष्याची स्थिति अशी झाली आहे की नैसर्गिक स्थिति कशी असावी याची अंधुक कल्पनादेखील करणे अशक्य झाले आहे. मनुष्याला सर्वात जवळचे प्राणि जे वानर त्यांसारखेच काहीसे गुण मनुष्या अंगात असायला पाहिजे होते ,आणि तो हल्लीप्रमाणे सुस्त न होतां एकसारखी काहीतरी चळवळ करण्याची आणि झाडांवर चढण्याची सहजप्रवूत्ति माणसांत असायला पाहिजे होती. त्याऐवजो हल्ली मोंठीं माणसे फारच क्वचित झाडावर चढतात,व लहान मुले नैसर्गिक प्रवृत्तीने चढू लागली तर त्यांना चढू देंतनाहीत. क्वचित अशा प्रकारची माणसे अजूनही दिसतात,तेव्हा ही केवळ कल्पनाच आहे असे म्हणतां येत नाही. बिनशेपटीच्या वानराची प्रचंड शक्ती आणि हालचाल पाहिली तर मनुष्याला लाज वाटली पाहिजे,कारण त्याची शक्तीही तशीच असायला पाद्दिजे होती.आणि जगात असे शक्तिमान लोक मुळीच नाहीत असे नाही. स्मर्ना येथील हमाल चांरपांचं पौंडाचे वजन सहज उचलू शकतो. साहारांतील उष्णता किंवा हिमालयातील थंडीही मनुष्य सहन करू शकतो, आणि पाणीं मिळाल्यास मनुष्य अन्नाशिवाय

१६