पान:आत्मारामपंत आणि मृत्यू शिपाई यांचा संवाद.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

यांचा संवाद. ९ मृ० -तुझा काळ जवळ आला असतांही तुला द्रव्याची आशा सुटत नाहीं, व तूं दुसऱ्याच्या मरणाची इच्छा ध- रितोस, व आपला जीव वांचवूं पाहतोस, ही तुझी केवढी दुष्ट वासना आहे ? तुला देवाच्या न्यायासनापुढे ह्या पात- काचा जबाब द्यावा लागेल. तेव्हां तुझीं सर्व गुप्त क उघडकीस येतील व तुला मोठी शिक्षा होईल, आ० - अरे मरणा, तूं मला कसा नेशील, व कोठें ने- शील याविषयीं माझ्या अनुभवास येण्याजोगें तुझ्यानें कहीं दाखवेल काय ? असें ह्मणतांच मृत्यूनें त्याच्या हातापायांची मोट बांधली व आपल्या पुच्छाचा वेढा घालून त्यास अधांत्री वर उच- ललें व चहूंकडला प्रदेश पहायास सांगितलें. तेव्हां आ- त्मारामपंतास एक मोठा समुद्र दिसला व त्याच्या पलिकडेस सर्व अंधारमय व भयंकर असे दिसूं लागलें. पुढे काय आहे, वाट कोठे आहे, आपण कोठें जाऊं हें त्यास कांहींच दिसेनासे झाले. परंतु एका खोल खांचेंतून रडण्याचा व दांत खाण्याचा आवाज ऐकूं आल्यासारिखें त्यास वाटू लागलें. तें ऐकून तो फार भयाभीत झाला; इतक्यांत मृत्यूनें आपल्या पुच्छाच्या नांगीनें