पान:आत्मारामपंत आणि मृत्यू शिपाई यांचा संवाद.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आत्मारामपंत आणि मृत्यु शिपाई कडाख्यानें करायाचें आहे, तर तूं माझ्यासारिख्याचे घरीं लवकर येशील हे माझ्या स्वप्न देखील नव्हतें. म० - तू असा विचार करीत राहिलास ह्मणूनच मी तुला मूर्ख ह्मणतों. आ० -तुला जे पाहिजेल तें ह्मण, पण तूं जसा आ- लास तसा परत जा. मी तुला कोपरापासून हात जोडून विनवितों. हे माझे भरज्वानीचे, खाण्यापिण्याचे व चैनबा- जीचे दिवस आहेत; माझ्या तोंडांत माती घालूं नको. गां- वांत झातारेकोतारे काय थोडे पडले आहेत ? खाण्यास काळ व धरणीस भार असे पुष्कळ आहेत त्यांस कां घे- ऊन जाईनास ? ज्यांस अन्न मिळत नाहीं, जे चार चार दि- वस उपास काढितात, त्यांस कां नेईनास ? रोगी माणसें रात्रंदिवस हाय हाय करितात, व तुला हाका मारितात, त्यां- जपाशीं कां जात नाहींस ? पाहिजे असल्यास माझ्या एखाद्या चाकरास घेऊन जा; नाहींतर माझा एका सावकाराबरोबर कोर्टात लाख दीडलाख रुपयांचा वाद चालला आहे, त्या सा- वकारास घेऊन जा. ह्मणजे माझा दावा खरा होईल. अरे मरणा, मी तुझ्या हातांतून कोठें जाणार आहें ? उगीच उतावळी करून माझ्या दुधांत विष कालवून तुला काय मिळणार आहे ?