पान:आत्मारामपंत आणि मृत्यू शिपाई यांचा संवाद.pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१० आत्मारामपंत आणि मृत्यु शिपाई त्यास किंचित् स्पर्श केला. तेव्हां त्याला अशा तीक्ष्ण वेदना होऊं लागल्या कीं तो मृत्यूची मोठ्या काकुळतीनें विनवणी करूं लागला की, मला एक वेळ क्षणभर मोकळे कर. माझा जीव फार कासावीस झाला, मी नाहींसा होतों तरी बरें झालें असतें, परंतु माझ्यानें हैं दुःख सोसवत नाहीं. मला सोड, मला सोड. तेव्हां मृत्यूनें त्यास मोकळा करून सोडिला, व सांगि- तलें कीं, अरे, तुझ्यानें माझ्या क्षाणक वेदना सोसवत नाहीत? मी तर तुला केवळ शरीरापासून वेगळा करून घेऊन जाणारा हलका शिपाई आहें. पण तूं आपलें पाप घेऊन मजबरोबर आलास तर पुढें तुझें शरीर व आत्मा हीं अक्षयी एक होऊन तुला जें दुसरें मरण प्राप्त होईल तेव्हां काय करशील ? -1 आ० - दुसरे मरण तें काय आहे ? 76- W मृ०-" भेकड व अविश्वासी व ओंगळ व घातक व व्यभिचारी व चेटकी व मूर्तिपूजक व सर्व लबाड ह्यांचा भाग अग्नीने व गंधकानें जळव्या सरोवरांत होईल; हे दुसरें मरण आहे." ( प्रग० २१:८.) - आ० - तेथें मला किती काळ रहावे लागेल? मृ० - तेथून बाहेर निघण्याची आशा व्यर्थ. अनंतकाळ