पान:आत्मारामपंत आणि मृत्यू शिपाई यांचा संवाद.pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

यांचा संवाद. आ० - शिपाई दादा, मी तुझ्या पायां पडतों. तूं मला छछूं नको, मर्जी असली तर आपलें नांव सांग. 11 शि - अरे, मी मृत्यु आहे. मला कोणी काळही ह्मणतात. आ० - तूं येथें कां आलास ? मृ० -तुला नेण्याकरितां आ० - नकोरे दादा, नको, तेवढें मात्र करूं नको. ० - कां नको! तूं आपल्या जिवाचा धनी आहेस की काय ? आ० - माझें घरदार, दौलत, व्यापार, मुलेंलेंकरें, वा- मृ यको यांस सोडून मी कसा येऊं ? त्यांची माझी भेट पुढे कोठें होईल ? अरे देवा, हें काय केलेंस, आतांच मला म रणाच्या तोंडीं कां देतोस? इतकें लौकर मरावें लागेल हें मला ठाऊक नव्हतें. मृ० - अरे, तुजपेक्षां लहान वयाच्यांस मी घेऊन जात असतों, हें तूं पाहत असतां तुला आपल्या जिवाची शाश्वती कशी वाटली! आ० - मी समजत होतों कीं, माझी दौलत पुष्कळ आहे, माझा व्यापार मोठा आहे, माझी अबरू मोठी आहे, माझ्या पदरी माणसें पुष्कळ आहेत, मला अजून मोठालीं कार्ये करायाची आहेत, माझ्या धाकट्या मुलीचें उग्न मोठ्या