पान:आत्मारामपंत आणि मृत्यू शिपाई यांचा संवाद.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६ आत्मारामपंत आणि मृत्यु शिपाई शि० - अरे, मी कोण आहे हे तुला अजून कसें सम- जलें नाहीं? माझी तूं कधीं आठवण केली नाहींस काय? आ०-नाही रे बाबा, मी तुला कर्धी पाहिलेंही नाहीं, मग तुझी आठवण ती मला कशी व्हावी ? शि० - अरे, मी तुझ्या गांवांतून नित्य फेन्या घालीत असतां तुझ्या मित्रांच्या, सोयन्ऱ्यांच्या, व दुसऱ्या ओळखीच्या माणसांच्या घरीं किती वेळां येऊन गेलों असेन, आणि तूं माझी त्यांजपाशीं विचारपूस कशी केली नाहींस बरें ? J - आ० - शिपाईबाबा, मला माफी असावी; तुझी माझ्या घरीं यापूर्वी कर्धीच आलां नाहीं, तेव्हां मला इतकी चौ- कशी करण्याची गरज पडली नाहीं. शि० - है तुझें भाषण मूर्खासारिखें आहे. मी आज हजारों जणांच्या घरी जात असतां तुझ्या येथे येणार नाहीं असे तुला कसें वाटलें ? तुझें नांव काय, तूं कोण, कोठून आलास, कोठें जाणार ह्या गोष्टींचा विचार जर तूं केला असतास तर माझ्या येण्याची काळजीने वाट पाहिली असतीस, व मजबरो- बर जाण्याची पूर्वीच तयारी करून ठेविली असतीस. ur