पान:आत्मारामपंत आणि मृत्यू शिपाई यांचा संवाद.pdf/५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

यांचा संवाद. सुळ्यांसारखे असून त्यानें जेव्हां ते करकरां चावावे तेव्हां त्याचें तोंड फार भयंकर दिसे. त्यास एक लांब पुच्छ होतें, त्याच्या शेवटास विंचवाच्या नांगीसारखी फार तीक्ष्ण नांगी होती. ह्या पुरुषाचा शिपाईबाणा होता. त्याच्यापार्शी अनेक प्रकारची नाश करण्याची आयुधें होतीं. अशा भयंकर रूपाचा शिपाई आपणाकडे क्रोधाविष्ट होऊन येत आहे असे पाहून आत्मा- रामपंताची पांचांवर धारण बसली. त्याचे हात पाय कांपूं ला- गले, काळीज धडधडूं लागलें, डोळयापुढे अंधारी येऊन जिव्हा आंत ओढूं लागली, सर्वांगास घाम सुटला, दंतपंक्ति एकमे- कांवर आदळू लागल्या, व कांहींच सुचेनासे झाले. त्यापुढून पळून जावें तर शक्ति राहिली नाहीं. इतक्यांत तो भयंकर शिपाई आरोळ्या मारीत व किंकाळ्या फोडीत याजपाशीं येऊन ठेपला. तेव्हां त्याच्या उग्र स्वरूपाकडेस पंताच्यानें पाहवेना ह्मणून त्याने आपले नेत्र झांकले. तें पाहून तो शिपाई त्यास मोठ्यानें हांक मारून ह्मणतो:- - शुद्धीवर ये, घाबरूं नको, मजकडेस , “अरे गृहस्था, पाहा, माझें भाषण ऐक. " हे शब्द ऐकून आत्मारामपंतास कांहींसा जीव आला. आणि तो हळूच ह्मणतो, तूं कोण आहेस रे दादा ?