पान:आत्मारामपंत आणि मृत्यू शिपाई यांचा संवाद.pdf/४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आत्मारामपंत आणि मृत्यु शिपाई प्रकारचे दुर्मिळ व अपरूप पदार्थ न्याहाळीत आहे, आणि मीं हें माझ्या कष्टानें व माझ्या द्रव्यानें मिळविले आहे, हें सर्व माझें आहे, यावर कोणाचा वारसा नाहीं, मजसारि- खा आज या गांवांत व या देशांत कोण सधन आहे ? माझी बरोबरी कोण करणार आहे ? माझ्या जातींत मीच श्रेष्ठ आहे, व इतर जातीचे लोकही माझ्या पायांकडेसच पाहतात, असा विचार मनांत आणून मोठ्या आनंदांत आहे इतक्यांत त्याच्या शरीरांत एकाएकी कांहीं विकार होऊन त्याचें रक्त मस्तकीं चढूं लागलें, तेर्णेकरून त्यास मूर्च्छा येऊन तो बेशुद्ध होऊन तें वर्त्तमान घरांतील मनुष्यांस समजतांच जिकडे तिकडे धांदल होऊन गेली. कोणी जोशास बोलवायास जा- तो, कोणी पंचाक्षऱ्याच्या घरीं धांवतो, कोणी कान्होबाच्या वाऱ्याच्या झाडाकडेस धांव घेतो, कोणी वैद्याकडेस जातो; याप्रमाणें होत आहे तो इकडेस आत्मारामपंतास आपल्या मू- च्छित अवस्थेत एक स्वप्न पडलें, तें येणेंप्रमाणें:- पडला. - त्यानें एक मोठा भव्य विक्राळ रूपाचा कृष्णवर्ण पुरुष आपणाकडेस येतां पाहिला. त्यास दोहों बाजूंस मोठे पंख होते, ते तो चालतांना मोठ्या जोराने फडफडावीत असे. त्याचे दांत "