पान:आत्मारामपंत आणि मृत्यू शिपाई यांचा संवाद.pdf/३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आत्मारामपंत आणि मृत्यु शिपाई यांचा संवाद. प्रवेश पहिला. "माणूस सगळे जग मिळवून आपल्या जिवाची हानि पावला तर त्याला काय लाभ होईल ?” ( मार्क. ८ : ३६. ) 4 संसारकसब्यांतील देहपुरींत आत्मारामपंत नामक गृहस्थ कुटुंबसहवर्त्तमान राहत होता. तो खाऊनपिऊन मोठा सुखी होता. त्यास कधींही कांहीं उणें पडले नाहीं. नानाप्रका रचीं वस्त्रे, अलंकार, भूपणें हीं पुष्कळ असून त्यानें आणखी रोज नवीं नवीं आणावीं. त्याला वागवगीचे, बंगले, गाड्या, घोडे बहुत होते. त्यास कधीं कोणता रोग ह्मणून ठाऊक नव्हता. हानि कशी असती ती अनुभवानें त्यानें जाणली नाहीं. व्यापारांत त्यास सर्वदां बरकतच होत गेली, लोकांत त्याला मोठें नांव व प्रतिष्ठा प्राप्त झाली. याप्रमाणें सर्व गोष्टी सुरळितपणे सुमारें दहा वर्षेपर्यंत चालल्या; त्यावेळी आत्मारामपंताचें वय पस्तीस वर्षीचें होतें. एके दिवशीं आत्मारामपंत आपल्या रंगमहालांत पलंगावर लवंडून, तेथील सुंदर आराप व उंची किमतीचीं पात्रें व वस्त्रे आणि नाना-