पान:आत्मारामपंत आणि मृत्यू शिपाई यांचा संवाद.pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

यांचा संवाद. २३ · परमेश्वर आपल्या दृष्टीचा प्रकाश तुजवर पाडो, आणि तुजवर कृपा करो. परमेश्वर आपली दृष्टि तुजवर लावो, आणि तुला शांति देवो.” ( गण. ६ : २४-२६. ) त्यानें आपल्या वडील मुलाच्या डोक्यावर हात ठेवून त्याला व दुसऱ्या सर्व मुलांस असा बोध केला कीं, माझ्या लेकरांनो, प्रभु येशू ख्रिस्त याच्या नामावर विश्वास ठेवा; व जशी त्यानें आह्मांस आज्ञा दिली तशी एकमेकांवर प्रीति करा. ( १ यो. ३:२३. ) पुढें त्याच्यानें फार बोलवेना ह्मणून त्यानें त्यांस गु- डघे टेंकायास सांगितलें व आपण मंदभाषणानें देवाची प्रार्थना केली कीं, "हे प्रभू, तूं आपल्या वचनाप्रमाणें आपल्या सेवकाला शांतीनें जाऊं देतोस कारण की, तुज- कडला जो तारणोपाय त्वां सर्व लोकांच्या समोर सिद्ध केला तो माझ्या (विश्वासाच्या ) डोळ्यांनी पाहिला आहे. तो राष्ट्रांच्या प्रकाशासाठी आणि तुझ्या इस्राएल लोकांच्या गौरवासाठी उजेड होईल.” (लू. २ : २९ - ३२.) " हे प्रभू येशू, माझ्या आत्म्याचा स्वीकार कर." (प्रे. ७ : ५९. ) असें बोलून तो निजला. मग त्याची मुले व बायको उटून " सर्व त्याजकडे निरखून पाहत असतां त्याचें मुख दूताच्या मुखासा- -