पान:आत्मारामपंत आणि मृत्यू शिपाई यांचा संवाद.pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आत्मारामपंत आणि मृत्यु शिपाईचा. रिखें दिसलें.” (प्रे. ६: १५.) परंतु त्याचा आत्मा "ज्या देवानें शरीरांत घातला होता त्याजकडे निघून गेला." (उप. १२:७.) - ह्या दृष्टांताचा बुद्धिमंत वाचकांनीं असा विचार करावा कीं, आह्मा प्रत्येकास आत्मा आहे, आणि आह्मी आत्मारामपं- ताप्रमाणें हल्लीं संसारकसव्यांत राहत आहों; तर ज्या आत्मारा- मपंताची आह्नीं ही गोष्ट वाचली किंवा ऐकिली, त्याला जशी मरणकाळी परमेश्वरापाशी जाण्याची आशा होती तशी आशा आह्मांला आहे काय ? जर असली तर तुझी धन्य आहां, आणि नसली तर आतांच आपल्या शेवटल्या परिणामाचा तुह्मा विचार करावा हें बरें आहे. ( अनु. ३२: २९.) कारण ज्याकडे आपण जात आहों त्या मृत्युलोकांत कर्म अथवा संकल्प अथवा विद्या अथवा ज्ञान नाहीं." " कांहीं ( उप. ९ : १०.) यावत् स्वस्थमिदं देह यावन्मृत्युव दूरतः ॥ त वदात्माहतं कुर्य्यात् प्राणान्ते किं करिष्यति ॥