पान:आत्मारामपंत आणि मृत्यू शिपाई यांचा संवाद.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२२ आत्मारामपंत आणि मृत्यु शिपाई झाला नाही, मूर्तिपूजकांचा व तत्त्वज्ञान्यांचा धर्म त्वां आच- रून पाहिलास, पण त्यापासून तुला शांति व जीवनदायक आशा प्राप्त झाली नाहीं. परंतु ईश्वरानें तुझे डोळे उघडले व तुला सद्गुरूची ओळख करून दिली ह्मणून तूं आतां नि- र्भय व आनंदभरित झाला आहेस. तर हा तुझा आनंद ल- वकरच पूर्णावस्थेस पावेल, व परमेश्वराच्या राज्यांत तूं त्याची सेवा व स्तुति करीत सर्वकाळ राहशील. व आत्मारामपंताविषयी पुढे काय झालें हें सांगण्यास आ झांस मोठा आनंद वाटतो. तो स्वप्नांतून जागृत झाला आ णि पाहतो तो आपला अंतसमय खराच जवळ आला असें व्यास समजले. मग त्यानें आपली प्रिय बायको व लेंकरें यांस जवळ बोलावून जो अनाथांचा नाथ त्याच्या हातीं त्यांस सोपिलें, व सांगितलें कीं माझ्या मागून मला भेटावयास तुझी लवकरच याल; मजविषयीं शोक करूं नका, देवावर आशा ठेवा, तो तुमचा सांभाळ करील. आपण लवकरच एका ठिका- णी एकत्र होऊं, तेथून आपला वियोग कधीं होणार नाहीं. त्यानें आपल्या बायकोचा हात आपल्या हातांत धरून तिला झटलें की " परमेश्वर तुला आशीर्वाद देवो. आणि तुझें रक्षण करो, -