पान:आत्मारामपंत आणि मृत्यू शिपाई यांचा संवाद.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

यांचा संवाद. २१ तुला आपले वाहन करून आपल्या बापाच्या घरीं नेण्यास लावीन. इतका जय मीं तुजवर मिळविला आहे. मृ० - अरे, पण माझ्याशिवाय जें दुसरें भयंकर मरण आहे त्याचा त्वां विचार केला आहेस काय ? त्याच्या हातां- तून कसा सुटशील ? आ० - " पहिल्या पुनरुत्थानांत ज्याचा भाग आहे तो धन्य व पवित्र आहे, त्यावर दुसऱ्या मरणाची सत्ता नाहीं. " ( प्रग. २० : ६.) याप्रमाणें मृत्यूनें आत्मारामपंतास कसोटीस लावून त्या- च्या विश्वासाची परीक्षा घेतली आणि तो खरोखर पुनर्ज- न्म पावलेला व मरणांतून जीवनाकडे पार गेलेला आहे अशी त्याची खातरी झाल्यावर तो त्यास ह्मणतो:- - मृ० - हे परात्पर देवाच्या सेवका, तूं धन्य आहेस. “तूं चांगलें युद्ध केलेंस ” व “धांवणें संपविलेंस." आतां "तुज- साठी न्यायीपणाचा मुगूट ठेविला आहे तो नीतिमान न्या- याधीश प्रभु तुला देईल. " अक्षय जीवनाचें वतन त्वां भि- ळविलें आहेस. जगांतील विषय व जगांतील सुखें यांची त्वां चव घेऊन पाहिलीस, परंतु तुला त्यांत वास्तविक आनंद प्राप्त