पान:आत्मारामपंत आणि मृत्यू शिपाई यांचा संवाद.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२० आत्मारामपंत आणि मृत्यु शिपाई वास नांगरासारिखी अचल व बळकट आहे." (इब्रि. ६:१९). मृ० -तुला माझ्या नांगीची आठवण आहे काय ? तिच्या दंशापुढे तुझा टिकाव काय निघणार आहे तो मला समजला. तिचा स्पर्श झाला पुरे; ह्मणजे तुझा प्राण व्याकूळ होईल. आ० - "अरे मृत्यू, तुझी नांगी कोठे आहे ? ( १ करिंथ. — १५:५५.) मृ० – “ मृत्यूची नांगी तर पाप. ” (१ करिंथ. १५:५६.) आ० -" आणि पापाचें सामर्थ्य काय ? " मृ० - पापाचें सामर्थ्य तर नेमशास्त्र आहे. ” ( १ करिंथ. १५ : ५६.) आ० - " पण आमचा प्रभु येशू ख्रिस्त याकडून देव आह्मास जय देतो. त्याची उपकारस्तुति असो." ( १ करिंथ. १५ : ५७. ) “ ख्रिस्तानें आमच्या ठिकाणीं शापपात्र होऊन आह्मास नेमशास्त्रांतील शापापासून सोडविलें आहे." ( गल. ३ : १३.) आह्मी आतां नेमशास्त्राच्या खालीं नाहीं, तर कृपेच्या खालीं आहों. (रो. ६ : १४.) ह्मणून पापाची सत्ता आह्नांवर चालणार नाहीं. करितां हे मरणा, तुझें बळ गेलें, तुझी नांगी मोडली. मी तुझ्या खांद्यावर बसून