पान:आत्मारामपंत आणि मृत्यू शिपाई यांचा संवाद.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८ आत्मारामपंत आणि मृत्यु शिपाई झाली आहेत." (२ करिंथ. ५ : १७.) “येशू ख्रिस्त पाप्यांस तारावयास जगांत आला, त्यांमध्ये मी मुख्य आहे.” ( १ तिम. १:१५.) असें जेव्हां मला समजलें तेव्हां त्याच्या पु- ण्यावर भरंवसा ठेवून देव जो बाप त्याकडून मी माझ्या सर्व पापांची क्षमा पावलों, आणि पापापासून मुक्त होऊन न्यायीपणाचा दास झालों आहें. ( रो. ६ : १८.) आणि. मी आतां अस्थिर द्रव्यावर आशा ठेवित नाहीं, तर ज्या देवानें मला उपभोगासाठीं विपुल दिलें आहे त्यावर माझी आशा आहे. मी उत्तम कर्मोनीं धनवान झालों असून ( १ तिम. ६ : १७, १८.) त्याच्या प्रीत्यर्थ मी तें खर्चिलें. . तूं मला आकांत करायास व रडायास सांगतोस, तर मी तुझ्या सांगण्याप्रमाणे करीत नाहीं. परंतु प्रभु जसें ह्मणतो त्याप्रमाणें, ह्मणजे “ शोक करितात ते धन्य, कारण कीं ते शांतवन पावतील.” ( माथी ५ : ४.) मी आपल्या पापांविषयों शोक व पश्चात्ताप करून शांतवन पावलों आहें, देवाच्या पवित्र आत्म्यानें माझें मन नवीन करून त्यांत शां- ति भरली आहे. तूं आणखी मला असें भय घालतोस कीं, माझें द्रव्य नासिलें आहे, व माझें सोनें व रुपें गंजले आहे. ● -