पान:आत्मारामपंत आणि मृत्यू शिपाई यांचा संवाद.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आत्मारामपंत आणि मृत्यु शिपाई मृ० - पण तूं मरण पावल्यावर तुझें काय राहणार आहे ? माणूस बोलतोचालतो तंव सर्व आहे, एकदां त्याची राख माती झाली ह्मणजे सर्व आटपलें. 32 आ० - जर ह्या आयुष्यांत मात्र खिस्तावर आमची आशा आहे तर सर्व मनुष्यांहून आह्मी लाचार आहों. परंतु आतां ख्रिस्त मेलेल्यांतून उठला आहे, आणि जसे आदामामध्यें सर्व मरण पावतात तसे खिस्तामध्ये सर्व जीवंतही केले जा तील. ( १ करिंथ. १५:२०, २२. ) मृ० -तुला ह्या गोष्टी कशावरून खऱ्या वाटतात? यांस कोण साक्षी आहे ? आ० - " जर आपण माणसांची साक्ष घेतों, तर देवाची साक्ष मोठी आहे; कां तर जी साक्ष देवानें आपल्या पुत्राविषयीं दिली, तीच त्याची साक्ष आहे. जो देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवितो त्यामध्येंच साक्ष आहे." ( १ योहा. ५ : ९,१०.) मृ० - तूं मोठा पापी आहेस, जन्मापासून तूं आजपर्यंत पापच करीत असलास, आणि ज्यावर तूं विश्वास ठेवितोस त्यानेंच असें ह्मटलें आहे की, " धनवानाला देवाच्या राज्यां- त जाणें यापेक्षा उंटाला सुईच्या नाकांतून जाणे सोपे आहे." ( मात्थी. १९:२४. ) - OF -