पान:आत्मारामपंत आणि मृत्यू शिपाई यांचा संवाद.pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

यांचा संवाद. १३ झाली होती, व प्रतिदिवश रात्रीस व पहांटेस दम्यानें तो फारच घाबरा होत असे, व त्याच्यानें क्षणभरही बसवत नसे, तरी त्याने आपल्या दुःखाविषयी कुरकूर केली नाही. तो असा विचार करी कीं, 6" ज्यावर प्रभु प्रीति करितो त्याला तो शिक्षा करितो; आणि ज्याला तो अंगीकारितो २ अशा प्रत्येक पुत्राला फटके मारितो." (इब्रि. १२ : ६.) मी हे दुःख प्रभूसाठीं सोशितों, तर पुढे मला चांगलें फळ मिळेल. " कोणतीही शिक्षा होतेवेळेस आनंदाची वाटत नाहीं, परंतु खेदाची आहे; तथापि शेवर्टी तर जे तिच्या योगें वहिवाटलेले त्यांस ती न्यायीपणाचें शांतिकारक फळ देती." ( इत्रि. १२ : ११.) यास्तव मी माझ्या रोगाविषयीं खेद कां करावा? हें जग माझें घर नाहीं, "मी येथें शरी- रांत वस्ती करीत असतां प्रभूपासून प्रवाशी आहे.” जेव्हां त्याचें बोलावणें येईल तेव्हां मी आनंदानें त्याजपाशीं जाईन अशा विचारांत आत्मारामपंत आपल्या शरीराच्या वेदना विस- रून चित्तांत समाधान पावत असे. एका रात्री त्याला झोंप ला- गली असता त्यास स्त्रप्न पडलें, आणि दाहा वर्षांमागे त्यानें जो भयंकर शिपाई पाहिला होता तो मोठ्या सौम्य व मनोहर रूपा-

-