पान:आत्मारामपंत आणि मृत्यू शिपाई यांचा संवाद.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२ आत्मारामपंत आणि मृत्यु शिपाई आ० - मला इतक्या सूचनेवरून संपूर्ण ज्ञान कसें होई - ल व मी तुझ्या येण्याची तयारी कशी करूं? - - ॐ मृ० - ह्याविषयीं विस्तारानें समजून घेण्यास व शिकण्या- स तुझ्या गांवांत सुवार्त्तिक या नांवाचा एक मनुष्य आहे त्याजपाशीं जा; ह्मणजे तो तुला सर्व सांगेल. असें ह्मणून मृत्यु निघून गेला. इकडेस आत्मारामपंताच्या शरीरास वैद्यांनी औषधोपचार केल्यावर, त्याची अत्यावस्था आ असे समजून आशा सोडिली होती, पण तो ह्या स्वप्नांतून मोकळा होतांच जरा जरा श्वास टाकूं लागला, नंतर काहीं पळांनी हातपाय हालवूं लागला, घटके अर्ध घटकेनें शुद्धीवर येऊन बोलूं लागला; कांहीं दिवसांनीं अगदर्दी बरा झाला. पुढे तो ईश्वरकृपेनें दाहा वर्षे वांचला. त्या काळांत त्याच्यामध्ये काय पालट झाला, हें वाचणारांनी त्याची व मृत्यूची जी शेवटची भेट होऊन त्या उभयतांचें जें संभाषण झालें त्यावरून समजावें. प्रवेश दुसरा. >> “ परमेश्वराच्या दिसण्यांत त्याच्या भक्तांचें मरण मोलाचें आहे. (गी. ११६ : १५.) ॐ आत्मारामपंत सुमारें एक महिना आजारी पडला होता, त्यास क्षयाचा उपद्रव होऊन त्याची प्रकृति फार अशक्त