पान:आत्मारामपंत आणि मृत्यू शिपाई यांचा संवाद.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

यांचा संवाद. ११ 1 हीच तेथली ठेप. तेथे तुझा लय होणार नाहीं, ह्मणजे जसें तुला वाटतें कीं, अगदीं नाहींसा झालो असतां दुःखां- तून सुटेन, तसें न होतां नित्य नित्य दुःसह दुःख व यातना भोगीत राहशील. त्याचा तुला आ०-हैं ऐकून मला भय वाटतें, तर मी आतां काय करूं? माझे तारण कसे होईल ? हें दुसरें मरण मला कसें चुकेल ? ५०- मी परात्पर देवाचा दूत आहे. असा निरोप आहे कीं, " तूं ह्मणतोस की, मी धनवान आहे, आणि म्यां धन मिळविलें आहे, आणि मला कशा- चीही गरज नाहीं. आणि तुला ठाऊक नाहीं कीं, तूं कष्टी व लाचार व दरिद्री व अंधळा व नागवा आहेस; यास्तव तुला मी असा बोध करितों कीं, त्वां धनवान व्हावें ह्मणून अग्नी- कडून शोधलेलें सोनें मजपासून विकत घे, आणि तुझ्या नग्नतेची लज्जा प्रगट होऊं नये ह्मणून नेसायास शुभ्र वस्त्रे घे, आणि तुला दिसावें ह्मणून अंजन आपल्या डोळ्यांस लाव." (प्रग. ३ : १७, १८) आणि आतां जें मीं सांगितले त्याची आठवण घर, पश्चात्ताप कर, जागृत रहा, कारण मी कोणत्या वेळीं पुन्हां तुजकडेस येईन हें तुला कळणार नाहीं. -