Jump to content

पान:आत्मविचार.djvu/७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आत्मविचार. गेच उपयोग किंवा मदांधकारें रज्जू सर्पवत् भासली ती रज्जू दीप- प्रकारों ओळखून स्वस्थ होणे इतकीच विचाररूप क्रिया अन्य; त्याचे निवृतीत काही कर्म नको. तसें ज्ञानानुभवें अज्ञानकृत सर्व मिथ्या यथार्थ समजून मी असंग, अक्रिय इत्यादिक अनुसंधान निरंतर ठेवणे इतकेंच विचाररूप कृत्य आहे; यांत क्रियाकर्माचा काय उपयोग? कारण बंध ही कांहीं वस्तु नसतां भ्रांति आहे; भ्रांतीची निवृत्ति विचाराने होते क्रियेने नाही. जसा शुकपक्षी आपणच नलिका धरून मला कोणी बांधले आहे अशा स्वकल्पनेनें धरलेली नळी सोडून बंधांत पडतो तसा आपलाच संकल्प आपला शत्रू होतो. विचारें पहातां सकल जगत् मुक्त अक्रिय असून आपलेच भावनेने बंधमोक्ष कल्पून दुःखी होते. आरशांत काय प्रतिबिंब असते जो पहातो तोच भासतो. तसे स्वसंकल्पानेच नानाकार भासतात. निद्रिस्तानवळ स्वर्गभोग वा सर्प व्याघ्र प्रत्यक्ष आले तरी मनांत कल्पना नसल्याने तद्विषयक सुखदुःखें त्यास होत नसतात व स्वप्नस्थास कोणतीही वस्तू प्रत्यक्ष नसून मनांत कल्पना असल्याने सुख दुःख होतात अथवा कोणी गृहस्थाचा पुत्र प्रवासात गेला तो तिकडे मृत माला तरी वर्तमान न कळल्याने त्याचा पिता सुखांत असतो किंवा तो सुरक्षित असून कोणी सांगितले की मृत झाला ते ऐकून दुःखी होतो एवं पुत्राचे मरण जिवंत रहाणे दोन्ही मुख दुःखास कारण नमून मनो हि जगतां का मनो हि पुरुषः स्मृतः मनकृतं कृतं लोके न गरीरकृतं कृतं ॥ चित्तं कारणमर्थानां तस्मिन्सति जगत्त्रयं । तस्मिन् क्षीणे जगत् क्षीणं तचिकित्स्याप्रयत्नतः।।