Jump to content

पान:आत्मविचार.djvu/७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५० आत्मविचार. कर्मे होतील त्याचे पुण्य पाप पण होणार; त्याचेही फल निश्चयात्मक आहे. निष्कामास चित्तशुद्धी, सकामास भोगार्थ देहारंभक याप्रमाणे अज्ञान्यास कर्मभोग चुकत नसून ज्ञान्यास कर्म बाधक नाहीत. कारण कर्ता, कर्म, फल ही तिन्ही परमार्थी सत्य नाहीत; अज्ञानकल्पित मिथ्या आहेत तस्मात् मुमुक्षूस निष्काम कर्मे चित्तशुद्धिद्वारा ज्ञानसंपादन करणेच योग्य. प्र०-जलसिंचन वृक्षाच्या उत्पत्तिवृद्धिरक्षणार्थी अगत्य हेतु तसे स्वाश्रम धर्म कर्मानें शुद्धांतःकरण होऊन ज्ञानोत्पत्ति वृद्धिरक्षण होते आणि उत्पन्न झालेला वृक्ष जलाविना नष्ट होतो तद्वत कर्माच्या अभावे उत्पन्न झालेले ज्ञानही नाश होईल. जसें कोणी स्थळी कोणी तपस्वी येऊन राहतात तें स्थळ काही निमितें अशुची झाले तर सर्व निघून जातात तसे कर्माच्या अभावें अंतःकरण मलिन झाल्यास ज्ञान वैराग्य राहणार नाही यावरून ज्ञान वैराग्यादिकांचें उत्पत्तिवृद्धिरक्ष- णार्थ कर्म अवश्य केले पाहिजे एवं ज्ञानकर्म उभय मोक्षास असले पाहिजे. स-जलाचें सिंचणे वृक्षोत्पत्तिवृद्धिरक्षणास हेतु तद्वत् ज्ञानास कर्म हेतू नाही. कारण ज्ञान हे काही नवीन उत्पन्न होत असते असे नसून ते मूळचेच स्वतःसिद्ध स्वप्रकाश आहे जसा प्रत्यक्ष सूर्य अभा. च्छादित दिसत नाही किंवा कांच भाजनांत दीप असतांही त्या पात्रावर मल आहेत तर बाहेर प्रकाश होत नाही. त्या अभ्राचा व मलाचा अवरोध आहे तो दूर झाला तर सूर्य दीप प्रकाशीत होतात तसा अज्ञान भ्रांतीने ज्ञान सूर्य आवृत्त आहे ते आवरण दूर झाल्यास स्पष्ट होते व तो निरंतर निरापेक्ष आहे ह्मणून त्याचे उत्पत्तिरक्षणांत क्रियाकर्माची अपेक्षा नाही. जसें स्वप्न निवृत्तीत जागृत होऊन स्वप्न मिथ्या जाण