पान:आत्मविचार.djvu/६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आत्मविचार. पुरुष धनप्राप्त्यर्थ एखाद्या धनवानाचे आर्जव करितो तितक्यांत आपले कार्य अन्य मार्गे निर्वृत झाले तर तो पुन्हः याचना करीत नसतां त्या- स तो अर्थ प्राप्त होत नाही. तशी काम्यकर्म इच्छेच्या अभावे नाश होऊन शेष संचितें, साधारण प्रायश्चित्ताने लयास जातात व वर्तमान- काळी जी नित्य नैमित्तिक क्रियमानकम घडतील ती भावीजन्मास कारण होत नसतां वर्तमानपापाचा नाश करितात एवं संचित प्रारब्ध क्रिय- माम ही तिन्ही कर्मच नष्ट झाली तर देहोत्पत्तिस कारणच राहिले नाही ह्मणून अनायासे मुक्ती. अशी कर्मे करून मुक्तता संभवत आहे. स०-जन्मांतर संचित कर्मातून परिपक्वतेनें फल देण्यास प्राप्त झाले में प्रारब्धरूप वर्तमानशरीर ते भोगांती निवृत्त होते हे सत्य परंतु अनेक जन्मार्जित संचित इच्छेच्या अभाव किंवा प्रायश्चित्ताने एक जन्मांत निशेष नाश होत नाहीत. जर इच्छेच्या अभावें संचित कर्म नष्ट होत असती तर अशुभ कर्माचे फल कोणास झाले नसते कारण अशुभ कर्माने पार होत असते त्याचे फल दुःख आहे, दुःखाची कोणीच इच्छा करीत नसतात तत्रापि भोग चुकत नाही ह्मणने ॥सुकृतैः सुखमायाति दुःग्वमायाति दुष्कृतैः॥ 'कर्मरूप बीनांनून वासना अदृष्ट असे दोन अंकुर उद्भवतात यांत शुभ कर्मामुळे शुभवासना व धर्मरूप अंकुर निघतो त्याणे शुभ कर्माकडे प्रवृत्ति होऊन पुण्ययोगें सुखभोग होतो. अशुभ कर्माने अशुभ वासना व अधर्मरूप अंकुर निघून अशुभ कर्म प्रवृत्तीने पापामुळे दुःखभोग घडतो यांत वासनेच्या उपायानं क्षय होतो पण अदृष्टाचा भोगविना क्षय नाही. एवं प्रायश्चित्ताने किंवा इच्छेच्या अभावें संचित करें नि:शेष नष्ट होत नाहीत हे सिद्ध आणि वर्तमानकाळी देहाहंतेने जी क्रियमाण