पान:आत्मविचार.djvu/६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आत्मविचार. स० दंडपहारें घटनाशफल आत्मत्वीं संभवत नाही, कारण नाश अज्ञानाचा कर्ता आहे. अज्ञान ही काही वस्तु नसून भ्रांती आहे. भ्रांती निवृती विचाराने होते क्रियेने नाही. रज्जूवर सर्प स्तंभावर तस्कर भ्रम झाला तो दूर करण्यास दंडशास्त्र घातक्रिया वृथा असून दीपप्रकाशें रज्जू, स्तंभ यांचे ज्ञान होतांच, याचे भय, दुःख नष्ट होते. तशी अज्ञान, भ्रांती अविचाराने आहे; त्यामुळे कर्मादिक दुःखें उत्पन्न झाली. या भज्ञानाचे विरोधी ज्ञान [विचारच ] मुख्य आहे, परंतु जशी दंडचक्रायभावेन यथा नोत्पद्यते घटः न विवेकायभावेन तथा ज्ञानं प्रजायते ॥ नोत्पद्यते विना ज्ञानं विचारणान्यसाधनैः यथा पदार्थभानं हि प्रकाशेन विना कचित् ॥ दंड चक्रादि अभावें घटोत्पत्ती नाही, तशी विवेकवैराग्याभावे ज्ञान- प्राप्ती नाहीं; जसा अंधारांतील पदार्थ प्रकाशाविना प्राप्त नाही, तोच प्रकाशाने प्राप्त, तसा आत्मज्ञानार्थ विचारच केला पाहिजे. आतां मलक्षा- लन कर्मही आत्मत्वी असंभव. आत्मा सदा शुद्ध, अमल, बोधरूप, स्वप्रकाश आहे; तथापि जसा मलिन आरसाअसल्यास मुखाभास होत नाही किंवा चक्षूस रोग असल्यास सूर्य प्रत्यक्ष असून दिसत नाही, तो, आरसा निर्मळ केला अथवा रोग निवृत्त झाला तर स्पष्ट दिसते, तसे अज्ञाना- वरणाने स्वस्वरूप आच्छादित आहे ते, ते आवरण दूर झाल्यास स्पष्ट होते. यास्तव आवरण दूर करण्यास चित्तशुद्धीची अपेक्षा व चित्तशुद्धीस निष्काम कर्मोपासनाच मुख्य होय. आणि चित्तशुद्धी नंतरही, पदार्थज्ञान नाही, तो, भांबावतो ह्मणजे घट आण, या शब्दाने जर घट शब्दाची व घटअर्थाची माहिती नाही, तर तो भांबावतो तद्वत