Jump to content

पान:आत्मविचार.djvu/६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आत्मविचार ४५ नाही. आणि जर नित्यनैमित्तिक न झाल्यांत पाप आहे तर त्या पापाची अनुत्पत्ती हेच त्यांचे पुण्यरूपफल स्पष्टच आहे व पुण्य पाप अवशेष तावत् देहारंभक होतात, याकरितां मलिनातःकरणे विवेकउदय नाही तावत् स्वाश्रमोचित नित्य नैमित्तिक निष्कामक, ईश्वरार्पित अगत्य करावी, त्याने चित्तशुद्धि होउन ज्ञानाधिकार व ज्ञानाने मुक्ति होते. समान पुण्य पापें, मनुष्य देह येतो, तेथें विचार झाला तर ज्ञानाने मुक्तता होते. ज्ञानाविना केवल कर्माने मोक्ष नाही. कारण- अविरोधितया कर्म नाविद्यां विनिवर्तयेत् विद्या विद्यां निहत्येव तेजस्तिमिरसंघवत् ॥ अविद्येचा व कर्माचा अविरोध आहे, मणने अविद्येपासूनच कमें जन्म पावली, त्या कमाने अविद्या नष्ट कशी होणार ! अरे जेथे प्रकाश तेथे अंधार रहात नाही, तद्वत ज्ञान व कर्माचा विरोध आहे ह्मणून विधेनेंच अविद्या व तदाश्रित कर्म नाश होतात ती विवा- नागमेन न यांगेन न व्रतेन जपेन च विचारेण विना जातु दृश्यते हदि योप्यजः ॥ विचारावांचून वेदपाठ, योग, याग, जप, तप, व्रत, दानादिक कर्माने कालत्रयीं प्राप्त नसून ज्ञानाभावे अज्ञान असेपर्यंत दुःखें दूर न होतां मुक्ती नाही. तस्मात् अविद्या ( अनान ) नाशार्थ विद्या [ज्ञान ] अवश्य संपादन केले पाहिजे. यास्तव ज्ञानानो अपेक्षा घटत आहे. प्र० दंडप्रहारकर्माने घटनाशफल; वस्त्रक्षालनकर्मीनें मलनाश- फल, प्रत्यक्ष होत आहे. याचप्रकारे वाश्रमधर्मकर्माने सकल दुरित दुःखें नष्ट होऊन मुक्ती संभवत आहे.