२४ आत्मविचार. स० मोक्षादिकसुखेच्छूस वेदशास्त्रांत विहित, निषिध, मिळून अथातो धर्मजिज्ञासा धर्मः प्रोक्तः श्चतुर्विधः नित्यो नैमित्तिकः काम्यः प्रायश्चित्तमिति क्रमात् ॥ चतुर्विध कमें सांगितली आहेत. यांत नित्यनैमित्तिक प्रायश्चित ही विहित असून काम्य हेच निषिध ( काम्य वृद्धिनेच निषिद्ध होते ) यांत वर्णाश्रमसमाचाराः शौचस्नानादयश्च ये आवश्यकास्तेनित्याः स्युरकृत्वा प्रत्यवति यान् ।। ज्या ज्या वर्णाश्रमास उचित अंतर्बाह्य शौच, स्नान, संध्या, जप, अग्रिहोत्रादिक में कर्म तें न झाल्यास प्रत्यवाय आहे आणि सदोदित ज्याचे विधान ही नित्य कर्मे होत, व देशकालनिमित्ता ये ते तु नैमित्तिकाः स्मृताः संक्रांतिग्रहणस्नानदानश्राद्धजपादयः॥ देश, काल, निमित्त, विधान, ग्रहण, संक्रांति, श्राद्धादिक, ही नैमित्तिक कमें हाणतात, आणि प्रायश्चित्तात्मका धर्माः कृच्छ्रचांद्रायणादयः कामनापूर्वकं काम्यं मुमुक्षोर्न विधीयते ॥ पापक्षयास विधानकर्म प्रायश्चित असून, फलानिमित्त विधानकर्म काम्य होय, ही करें अज्ञानतावत् देहाहंतेने करण्यांत सकामीस स्वर्गादिक फल व निष्कामीस चित्तशुद्धिफल देतात; पण जन्ममरण अभाव होत १ नहोणे.
पान:आत्मविचार.djvu/६४
Appearance