पान:आत्मविचार.djvu/६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आत्मविचार. १३ दिकांचे तात्पर्य आहे. यांत ज्ञानमार्ग स्वल्पायास व श्रेष्ठ आहे, परंतु त्यास चित्तशुद्धीची अपेक्षा असून चित्तशुद्धीचे साधन जी निष्काम- क्रिया यासच कर्म मटले आहे. आणि उपासना पण त्यांचे अंतर्गत मान- सिककर्मच होय. ह्मणने मूर्तिपूजक व मूर्तिनिषेधक दोन्ही कल्पितच आहेत. मूर्तिपूजक कल्पनेंप्रमाणे मूर्ति करितात व मूर्तिनिषेधक नुस्त्या कल्पनेवरच आपले काम भागवितात यांत फरक तो काय? अज्ञान आहे तावत दोन्ही- ही सारखेच; परंतु दोन्ही कल्पनेस ने अधिष्ठान तें निर्गुणरूप मन वाणचिक्षुरादिकास अग्राह्य यास्तव सगुण अवताररूपाची उपासना प्रथम सांगितली आहे. यास्तव व्यक्ताव्यक्त सर्व एकच परब्रह्म असून निराकार, व साकाराचा सत्य, मिथ्या, मात्र भेद आहे, साकार परिछिन्न अल्पमिथ्या असतां भेषबुद्धीने त्याचे अर्चक परिछिन्न अल्प फल पावतात. तथापि दोन्ही रूपें कळल्याविना ब्रह्मज्ञान होतच नाही, मणून साधकास आरंभी सगुण साकारच मुख्य होय. त्यांत निष्कामक, चित्तशुद्धी व कर्म भोगांती व्यर्थ; एवं सगुण निर्गुण एकच जाणून बुद्धीमान निराकारी एकाएकी मन स्थिर होणे दुर्घट, यास्तव प्रथम साकार उपासना मार्गे निर्गुण निराकारी येऊन मिळतात. असे ज्ञान व कर्म असे दोनच मार्ग मुख्य आहेत. प्र० मोक्षेच्छस नित्यनैमित्तिक, प्रायश्चित, काम्य, अशी कमें शास्त्रांत सांगितली आहेत, ती कशी आणि नित्यनमित्तिक कर्मे झाल्यांत पुण्य नसून, न झाल्यांत पाप आहे. यास्तव पापाचे अनुद्भवाकरितां नित्यनेमि- त्तिकें केली पाहिजे. त्यांत ते पुण्य पाप सम होऊन मोक्ष होतो तर मोक्षेच्छूने कर्मेच करावी, ज्ञानापेक्षां कारण नाही. १ साकारनिराकार.