आत्मविचार. निवृति होते. या अंतःकरणेंद्रियजयास पूर्वोक्त दोनच मार्ग असून ज्ञानास विहंगममार्ग व कर्मास पिपिलीका मार्ग ह्मणतात. जसा पक्षी वृक्षागी फल अवलोकन करून एक भरारीसरसा त्याजवळ जाऊन फलप्राप्त करितो, तसे सामर्थ्य पिपीलिकेसे नाही. तथापि अनुसंधानुक्रमाने फळ पावतें किंवा सशक्तपुरुष दूर अंतरावरील ग्रामी सत्वर जातो व अशक्त हळु हळु पण नातो, तद्वत तीव्राज्ञ सद्गुरुवाक्य श्रवणाबरोबर तत्काल ज्ञान आकलन करून प्रकृतीचे सर्व धर्म सोडणारा त्वरितमोक्षफळ प्राप्त करितो; व मंदप्रज्ञ रजतमक्षये सत्यवृद्धीने, निष्काम कर्माचरणे, तत्ववि- वेचनादिक्रमाने, ज्ञान व मोक्ष पावतो; असें ज्ञान कर्म दोन्ही मार्ग एकेच कारणी असून अधिकारभेदें भेद आहे. यास्तव मोक्षेच्छ्न स्वाधिकार विचारून तसे वर्तले असतां, निःशेष दुःखनाशें अखंड सुख प्राप्ती होत आहे. प्र० निरंतर सुखरूपमोक्षप्राप्तीस वेदशास्त्रांत कर्म, उपासना, ज्ञान, असे मार्ग सांगितले आहेत, व आपण दोनच मांगितले याचे कारण काय आणि यांत स्वल्पायास व श्रेष्ठ कोणता आहे. स. मुख्यत्वे ज्ञान न कर्म असे दोनच मार्ग असून कर्माचे अंतर्गत उपासनाभेद अधिकार परत्वें झाला आहे ह्मणजे विषयाशापाश तुटल्याविना जीव दुःखमुक्त होणार नाहीत. ते विषय एकाएकी सुटणे दुर्घट, यास्तव हळु हळु अंतरंगता होऊन विषय सोडण्यास वेदशास्त्राने अनेक मार्ग प्रकाशित केले. जसें सूर्योदयीं बहुत मार्ग दिसू लागतात; त्यांत जो ज्यास चालण्यास उचित तो त्या मार्गी चालता होतो, तसें जीव आपला अधि- कार विचारून त्या मार्गी चालतील तर क्रगाने मुक्त होतील असे वेदा- १ जिंकण्यास. २ मंगि
पान:आत्मविचार.djvu/६२
Appearance